Sharad Pawar And Devendra Fadnavis travel together
ADVERTISEMENT
पुणे : राजकारणाच्या मैदानावर कायमचं एकमेकांवर टीका करणारे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांनी त्या टिकांनी प्रत्युत्तर देणारे पारंपारीक विरोधक रविवारी एकाच मंचावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे पुण्यातील भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट्स हौसिंग कॉम्प्लेक्सचा उद्घाटन सोहळ्याला आज हजेरी लावली होती.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते. यावेळी पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार अदर पूनावाला यांना प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमादरम्यान, सर्वांना भुवया उंचावणारं दृश्य बघायला मिळालं. या कार्यक्रमा दरम्यान, मेडिकल कॉलेजचे गेस्ट हाऊस ते लेडीज हॉस्टेलपर्यंत पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी गाडीत मागील सीटवर पवार आणि फडणवीस होते आणि पुढच्या सीटवर शिवाजीराव कदम होते. गेस्ट हाऊसमधून जात असताना पवार, फडणवीसांना म्हणाले, चला माझ्या सोबत, त्यानंतर तात्काळ होकार देत फडणवीसही पवारांच्या गाडीत बसले.
त्यानंतर लेडीज हॉस्टेलपासून कार्यक्रम स्थळापर्यंत परत येत असताना दोघांनीही पुन्हा एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी मात्र, पुढच्या सीटवर विश्वजीत कदम होते. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी गदारोळ पाहता पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT