राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील हे रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील आणि इतर काही मंत्री आहेत अशीही माहिती कळते आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात येतं आहे.
ADVERTISEMENT
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांनी तेथील पूरपरिस्थितीची पाहणीही केली होती.
दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती आता चांगली असल्याचं समजतं आहे. त्यांच्या नियमित तपासण्याही करण्यात आल्या आहेत असंही कळतं आहे. आजच कॅबिनेटची मिटिंग होती. या मिटिंगसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले मात्र त्यांची प्रकृती बिघडली त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?
आज कॅबिनेट सुरू असताना जयंत पाटील यांना अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे ते बाजूला आले आम्ही त्यावेळी त्यांना विचारलं तर त्यांनी अस्वस्थ वाटतं आहे असं सांगितलं. आम्ही तातडीने त्यांना ब्रीच कँडीला आणलं. ब्रीच कँडीला आणल्यानंतर त्यांच्या ज्या काही आवश्यक तपासण्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत. ईसीजीही काढण्यात आल्या आहे. त्यांच्या हार्टची काय स्थिती आहे त्यासाठीची चाचणी करण्यात येईल. सकाळपर्यंत जयंत पाटील यांना अंडर ऑबझर्व्हेशन ठेवण्यात येणार आहे. गरज पडली तर सकाळी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात येईल.
ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना आजचा दिवस ठेवण्यात येणार आहे. टू डी इको टेस्टही केली जाणार आहे. त्याचा रिपोर्ट काय येतो ते पाहून डॉक्टर अँजिओग्राफी करायची की नाही त्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सगळ्यांशी बोलत आहेत, व्यवस्थित आहेत. सध्या घाबरण्यासारखं काहीही नाही असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काही मायनर बदल आहेत. त्यामुळे टू डी इको टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
जयंत पाटील यांनी काय ट्विट केलं आहे?
‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’
ADVERTISEMENT