NCP Leader Jitendra Awhad :
ADVERTISEMENT
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड वादात सापडले आहेत. पुण्यातील “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या यात्रेदरम्यान विनोद तावडे यांच्या जुन्या विधानाचा हवाला देत केलेल्या काही वक्तव्यांवरुन वाद रंगला आहे. विनोद तावडेंनी शिक्षणमंत्री असताना “अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार” असं सांगितलं होतं. यावरुन आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते”, असं सांगत, तावडेंना उत्तर दिलं. याचवरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. (NCP Leader jitendra Awhad clear his stand on Chhatrapati shivaji maharaj statment)
दरम्यान, या सगळ्या वक्तव्यांवर आणि वादावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘मुंबई तक’ दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
अचानक हा विषय का काढला? या प्रश्नांवर बोलताना आव्हाड म्हणाले, कुतुबशाही, निजामशाही आदिलशाही आणि मुघलशाही यांचा काहीही संबंध नाही. विनोद तावडेंना पहिल्यांदा समजावून सांगावं लागेल, मुघलशाही आणि कुतुबशाही यांचं कधीच जमलं नाही. अफलखान हा आदिलशाहीमधून आला होता. हे दक्षिण प्रांतातील सुलतान होते आणि मुघल उत्तरेतील सुलतान होता.
Exclusive: ‘माझ्यावर ठाकरेंचं प्रचंड ओझंय’, आव्हाडांनी सांगितला ‘तो’ इंटरेस्टिंग किस्सा
शहाजीराजे आणि त्यांचे वडील हे दक्षिणेतील सल्लतनमधील सरदार होते. त्यामुळे हे असं एवढं सोप्प नाही. तुम्ही म्हणता आम्हाला मुघलांचा इतिहास काढायचा आहे. मुघलांचा इतिहास म्हणजे काय? त्यांनी जवळजवळ ४०० वर्ष भारतावर राज्य केलं. त्यांचा इतिहास दाखविणार नाही म्हणजे काय म्हणणार तुम्ही, मुघलं आलेचं नव्हते का? समरकंदहुन बाबर आला तिथं काय दाखविणार तुम्ही? पहिलं पानीपतचं युद्ध, दुसरं पानीपतचं युद्ध, तिसरं पानीपतचं युद्ध? काय दाखविणार तुम्ही? असं इतिहासाचे तुकडे नाही करता येत. अहमदशाह अब्दाल्ली कुठून आला होता?
तुम्ही स्टॅलिनग्राडच्या लढाईमधून स्टॅलिन आणि हिटलरला बाजूला काढा? काय दाखविणार तुम्ही? मग तुम्ही शिकविणार काय महाराष्ट्राच्या मुलांना? महिषासुरमर्दिनिच्या पायाखालून महिषासुराला बाजूला काढा आणि मला त्या देवीचं वर्णन सांगा. असं असतं की तुम्हाला एखादी प्रतिमा लागते. अफजलखान हा एक लाखाचं सैन्य घेऊन आला होता. म्हणजे तो मोठा होता. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सांगितलं, त्याला माळरानावर लढाईला संधी देऊ नकोस. मग शिवाजी महाराजांनी आपल्या योजनांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, हे चित्रपटासारखं आहे सगळं.
“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतून फुले, शाहू, आंबेडकर शिकवायचं नाही, असं सांगितलं, असा आरोप करत आव्हाड म्हणाले, त्यांचा संबंध इथल्या मातीशी आहे. इथल्या मातीत त्यांचा सुगंध आहे आणि हा सुगंध त्यांच्या नाकाला त्रास देतो. अधिकारी त्या विचाराने पुढे जातात आणि तो बहुजनांचा विचार आणि त्यांना तो तोडायचा आहे. मध्ये एक भिंत उभी करायची आहे, असंही ते म्हणाले.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
ADVERTISEMENT