महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. त्यांना याआधी देण्यात आलेली मुदतवाढ ही 31 डिसेंबर रोजी संपली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर आर्यन खानच्या अटकेपासून ते सतत चर्चेत राहिले होते. पण याच प्रकरणात त्यांच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
‘भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व कमी झालं आहे’ नवाब मलिक यांचं वक्तव्य
याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांनी जेव्हा ऑक्टोबर महिन्यात कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला आणि आर्यन खानला अटक केली तेव्हापासून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर विविध आरोप केले. आता त्यांनी समीर वानखेडे यांच्या बदलीनंतरही प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर दुबईतून ‘फोटोबॉम्ब’
काय म्हणाले नवाब मलिक?
समीर वानखेडेंनी जो फर्जीवाडा केला, त्याच्या तक्रारी आम्ही केल्या असून आमच्या तक्रारींवर कारवाई सरू आहे. जात पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीनंतर त्याची पण चौकशी सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय येईल आणि त्यांनी खोटं प्रमाणपत्र जमा केल्याचं समोर येईल. युपीएससीच्या नोकरीत असताना त्यांनी स्वतःच्या नावाने सदगुरु बारचा परवाना घेतला होता. तसेच दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी पत्नीचा व्यवसाय आणि संपत्तीबद्दलल माहिती लपवली होती. त्याबदद्ल तक्रार केल्यानंतर तपास सुरू आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणात एसआयटीकडून देखील तपास सुरू आहे. ज्या तक्रारी मी केल्या होत्या, त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. त्या तक्रारी सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल, याची मला खात्री आहे. असं नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे मनमानी आणि चुकीच्या पद्धतीने कारभार करत होते. मला वाटेल ते मी करेन मला कोणीच बोलणार नाही, हा त्यांचा गाफीलपणा होता, तो त्यांना नडला आहे. एखाद्या अधिकाऱ्याने मर्यादेच्या पुढे जाऊन काम केलं की त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्यांनी पदाचा वापर करून जे गैरफायदे घेतले त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आर्यन खान प्रकरणात जे घडलं त्याचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तपासात काही अडल्यास किंवा तपास थांबवल्यास आम्ही जाब विचारू, असं मलिक म्हणाले. तसेच वानखेडेंच्या बदलीनंतरही हा लढा सुरूच राहील आणि फर्जीवाडा करणाऱ्यांना मी लोकांसमोर आणणार, असं मलिक म्हणाले.
माझ्याविरोधातील कोणती तक्रार प्रलंबित असेल तर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करायला पाहिजे. ते तपास करत नसतील तर मी पत्र लिहून तपास करण्याची मागणी करणार. जर कुणी अधिकारी लोकांना माझ्याविरोधात तक्रार करायला लावत असतील, तर त्याबद्दल कारवाई व्हावी, अशी मागणी मी करणार असल्याचं मलिक यावेळी मलिक म्हणाले.
ADVERTISEMENT