ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. एखादा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं दाखवलं जात असेल, एखादी व्यक्ती त्यासंदर्भात वेदना मांडत असेल त्यामुळं जर अटक होत असेल आम्ही या अटकेच्या कारवाईचं स्वागत करते, असं म्हणतं खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
खासदार सुळे म्हणाल्या, मला एका गोष्टीची गंमत वाटते की राज्यात चाललंय का? जो चूक करतो त्याला माफी आणि जो आंदोलन करतो त्याला शिक्षा होते. ब्रिटीशराजचे दिवस मला आठवतात. पण मी तुम्हाला आवर्जून सांगु इच्छिते की जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी बोलावण्यात आलं. तिथं गेल्यावर त्यांना कळलं की वरुन दबाव येतोय. वरुन म्हणजे नेमका कुठून दबाव येतो, याचं उत्तर माझ्याकडे नाही.
मी कोणावर आरोपही करत नाही. कारण दबाव येतोय, यात पोलिसांची काहीही चूक नाही. पण सत्तेत असो किंवा नसो महाराष्ट्राच्या आम्हाला मला पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कोणाचा फोन येत असतील अशी जी चर्चा आहे ती शक्यता नाकारता येत नाही.
दुसरा मुद्दा ज्या कारणासाठी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आहे, म्हणजे एखादा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं दाखवलं जात असेल आणि एखादी व्यक्ती त्यासंदर्भात वेदना मांडत असेल त्यामुळं जर अटक होत असेल तर आम्ही या अटकेच्या कारवाईचं स्वागत करते. आणि आम्हाला या कामासाठी आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जायला लागलं तरी तयार आहे. आव्हाडही जर या कारणासाठी तुरुंगात गेले असतील तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
या सरकारनं उत्तर द्यायला पाहिजे, की तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात असाल तर सांगा आम्ही ताकदीनं ही लढाई लढू. जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेतल्याचा आरोप होतोय यावर खासदार सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांना अटक कशासाठी, त्यांनी कुणाला मारहाण केली का? मी व्हिडीओ पाहिले. यात ते गप्प बसा असं सांगत होते, त्यांनी हातांची घडी घातलेली होती. मग गप्प बसायला लावणं हा गुन्हा होतो का?
ADVERTISEMENT