योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर (IIMN) विक्रमी वेळेत विकसित केलेली आपले अत्याधुनिक नवीन कॅम्पस जगासाठी 8 मे रोजी खुले करत आहे. 2015 मध्ये स्थापन झालेले आयआयएम नागपूर ही सर्वोत्कृष्ट सुविधा आणि शिक्षकांसह सर्वात वेगाने वाढणारी बिझनेस स्कूल आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 8 मे रोजी सकाळी 10.00 वाजता नागपुरातील मिहान येथील नवीन कॅम्पसचे उद्घाटन पार पडणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
IIM,नागपूर चे वैशिष्ट्य:-
आयआयएम नागपूर चे कॅम्पस 132 एकर परिसर मध्ये असून त्याच्या पहिल्या टप्प्यात 600 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. सध्या, IIMN मध्ये 20 हाय-टेक क्लासरूम आणि 24 ट्रेनिंग आणि सेमिनार रूम्ससह 400 सीटर कन्व्हेन्शन सेंटर आहेत.
१३२ एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले येत असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. शहराच्या अगदी शेजारी असलेल्या मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सध्या ६६८ विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील करण्यात आली आहे.
१३२ एकराच्या या प्रकल्पामध्ये व्यवस्थापन आणि आस्थापनाचे महत्वाचे केंद्र उघडण्यात आले. यात ६६५ विद्यार्थी विविध शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या प्रशिक्षणाची यंत्रसामुग्रीने ह्या वर्गखोलया सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार असून देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती या संस्थेला मिळत आहे. २०१५ ला सुरु झालेल्या या संस्थेला नव्या कॅम्पसमुळे झळाळी आली आहे.
आयआयएम नागपूर येथे २० हायटेक क्लासरुम आणि २४ प्रशिक्षण केंद्रे आहेत. या शिवाय ४०० आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे आपले ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत, त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण ७ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT