पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवकाळी पावसात प्रवास करत असताना झाडाची फांदी अंगावर कोसळून नवविवाहीत दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
पुणे ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रेणुकेश जाधव आणि त्याची पत्नी सारिका जाधव हे सासवड रस्त्यावर आपल्या दुचाकीने प्रवास करत होते. यावेळी अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली आसरा घ्यायचं ठरवलं.
यावेळी झाडाची फांदी या दाम्पत्यावर कोसळली ज्यात रेणुकेश आणि सारिकाचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच यावेळी तिकडे उपस्थित असलेली 7 वर्षांची मुलगीही गंभीर जखमी झाली. या मुलीला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतू शनिवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
बीड : जीप आणि ट्रकचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू
दरम्यान 4 महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या रेणुकेश आणि सारिकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या तिघांचा मृत्यू, खासगी ट्रॅवल्स-ऑल्टो गाडीचा भीषण अपघात
ADVERTISEMENT