मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणाचा तपास सर्वप्रथम गुन्हे तपास शाखा म्हणजे सचिन वाझेच करत होते. त्यावेळी त्यांनी जप्त केलेले काही डिजिटल पुरावे नष्ट केले किंवा त्यांच्याशी छेडछाड केल्याचा संशय एनआयएला असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. जप्त केलेल्या पुराव्यातील काही डेटाही गहाळ असल्याचंही सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हीडिओ रेकॉर्डर संदर्भातले पुरावेही वाझेंनी डिलीट केले असल्याचे किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याचा एनआयएला संशय आहे.
हे पूर्ण प्रकरण मुख्यत्वे डिजिटल पुराव्यांवर आधारित आहे. त्यामुळे यातील डिजिटल पुराव्यांना मोठे महत्त्व आहे. म्हणूनच, सचिन वाझे यांनी नियोजनपूर्वक ते पुरावे हटवण्याचा प्रयत्न केला असल्याचं एनआयए सूत्रांनी म्हटलं आहे.
NIA ने घेतला CIUमधील ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब, वाझेंचं पुढे काय होणार?
जप्त करण्यात आलेला फोन, आयपॅड आणि डीव्हीआर यामधील डेटा परत मिळवण्यासाठी आता ते फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहे. वाझेंनी यातील नेमका कोणता डेटा हटवला किंवा त्याच्याशी छेडछाड केली, हे देखील फॉरेन्सिकच्या अहवालातून समोर येईल.
एनआयएच्या अधिकाऱ्यांना खात्री आहे की, ज्या गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवण्यात आलं होतं ती स्कॉर्पिओ गाडी वाझेंच्याच ताब्यात होती. ही गाडी चोरीला गेल्याचा दावा केला जात होता, मात्र ती चोरीला गेलीच नव्हती. आता साकेत इमारतीच्या डीव्हीआरमधून हे स्पष्ट होईल, असंही सुत्रांकडून समजतं आहे.
Sachin Vaze प्रकरणावरून अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाल्या…
शिवाय, मनसुख हिरेन यांनीच ती गाडी विक्रोळीला ठेवली, त्यानंतर गुन्हे तपास शाखा म्हणजे CIUच्या अधिकाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे भेटून तिच्या चाव्या दिल्या. मग, त्या सीआययू अधिकाऱ्याने ती स्कॉर्पिओ सचिन वाझेंचं निवासस्थान असलेल्या साकेत इमारतीत ठेवली असल्याचा एनआयूला संशय आहे. साकेत इमारतीचा डीव्हीआर मिळवण्यासाठीचं पत्रही सीआययू युनिटने पुराव्यांच्या रेकॉर्डवर घेतलं नसल्याचं एनआयए सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
वाझेंच्या सोसायटीमधलं ‘ते’ CCTV फुटेज NIA च्या ताब्यात
NIA ने 15 मार्चला रात्री CIU च्या कार्यालयावर छापे देखील मारले होते. यावेळी एनआयएला सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं होतं.
या छापेमारीत NIA ने लॅपटॉप, फोन, साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजचा DVR ताब्यात घेतला आहे. सचिन वाझे यांनी आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला होता. याव्यतिरीक्त सचिन वाझे यांच्या केबिनमधून अनेक महत्वाची कागदपत्र NIA च्या हाती लागलेली आहेत.
NIA नुसार PPE KIT घातलेली ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच!
NIA ने 15 मार्चला रात्रीपासून सुरु केलेली छापेमारी 16 मार्चच्या सकाळपर्यंत सुरु होती. यादरम्यान NIA ने सात पोलीस अधिकाऱ्यांचा जवाब देखील यावेळी नोंदवून घेतला. ज्यात ACP नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक मिलींद काथे, API रियाझ काझी, API प्रकाश होवळ आणि ३ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. NIA ने यादरम्यान एक मर्सिडीज गाडीही ताब्यात घेतली होती.
25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओ प्रकरणाचे पडसाद थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उठले होते. त्यानंतर या प्रकरणातील अनेक छोट्या-छोट्या बाबी आतापर्यंत समोर आल्या आहेत.
ADVERTISEMENT