नागपूर: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कोरोनाची (Corona) फारच भीषण परिस्थिती आहे. त्यातही नागपूरमधील (Nagpur) परिस्थिती ही फारच स्फोटक झाली आहे. कारण इथे रुग्ण आणि मृतांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजन, औषधं या सगळ्याचाच प्रचंड तुटवडा आहे. अशावेळी आता केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे स्वत: महाराष्ट्रात आले आहेत. यावेळी गडकरी हे फक्त नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी अॅक्टिव्ह झाले आहेत.
ADVERTISEMENT
नितीन गडकरी यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती देताना म्हटलं की, ‘सध्या थोड्या अडचणी येऊ शकतात. पण लोकांचे जीव वाचवणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने तयारी करत आहोत. लोकांचा जीव कसा वाचेल हाच आमचा प्रयत्न आहे.’ असं गडकरी म्हणाले.
नागपूरमधील एका कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी गेलेले असताना नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नागपूरमधील परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे.
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाची भयावह परिस्थिती, वास्तव दाखवणारा ‘मुंबई तक’चा ग्राऊंड रिपोर्ट
दरम्यान, नितीन गडकरी यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. जी व्हर्च्युअल माध्यमातून पार पडली. ज्याला नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील हजर होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सज्ज असले पाहिजे आणि त्याचे नियोजन करण्याच्या हेतूनेच नितीन गडकरी यांनी ही बैठक घेतली होती.
एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर गडकरींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी देखील चर्चा केली. यावेळी त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा याविषयी माहिती देखील त्यांना दिली. त्यानंतर रेमडेसिवीरचे प्रोडक्शन वाढविण्यासाठी 7 नव्या साइटला परवानगी दिली आहे. याशिवाय रेमडेसिवीरबाबत इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाची भयावह परिस्थिती, वास्तव दाखवणारा ‘मुंबई तक’चा ग्राऊंड रिपोर्ट
याशिवाय लोयड स्टीलचे मालकांशी संवाद साधून वर्धा येथील त्यांचा प्लांट ताबडतोब अॅक्टिव्ह करण्याची विनंती केली आहे. इथे 350 मेट्रिक टन ऑक्सिजन बनविण्यात सुरुवात करावी असंही यावेळी गडकरींनी सांगितलं आहे. ज्याचा फायदा फक्त विदर्भच नव्हे तर मराठवाड्याला देखील होणार आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आता स्वत: गडकरी हे महाराष्ट्रात आले असून ते तात्काळ अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे आता बैठकांच्या सपाटा लावला असून अनेक स्तरावर वेगवेगळे आदेश आणि सूचना देणं सुरु केलं आहे.
एकूणच नागपूर आणि महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. त्यामुळेचा आता केंद्रातील एखाद्या सक्षम नेत्याने ही परिस्थिती हाताळावी असं केंद्रीय नेतृत्वाला वाटल्याने गडकरी यांना महाराष्ट्रात धाडण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गडकरी नेमके कोणकोणते निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT