मोक्काच्या आरोपीला नितीन राऊतांच्या मुलाकडून आश्रय; राष्ट्रवादीचा मित्रपक्षाच्या नेत्यावर आरोप

मुंबई तक

• 09:38 AM • 22 Feb 2022

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमधला वाद आणि सुंदोपसुंदी काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाचा नवीन अंक नागपूरमध्ये पहायला मिळत आहे. ज्यात उर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊतने मोक्काच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीला दीड वर्षांपासून आश्रय दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या […]

Mumbaitak
follow google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमधला वाद आणि सुंदोपसुंदी काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाचा नवीन अंक नागपूरमध्ये पहायला मिळत आहे. ज्यात उर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊतने मोक्काच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीला दीड वर्षांपासून आश्रय दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केला आहे.

कुणाल राऊत हे राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असून ज्वाला धोटे या विदर्भवादी नेते जांबुवंत धोटे यांच्या कन्या आहेत. या आरोपांमुळे नागपूर शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

ज्वाला धोटे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत. अभिषेक सिंग असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो फरार असून राऊत पितापुत्रांसोबत हा आरोपी अनेक कार्यक्रमांमध्ये फिरत असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे. ज्वाला धोटे यांनी अभिषेक सिंग यांचा कुणाल आणि नितीन राऊत यांच्यासोबतचे फोटोही या पत्रकार परिषदेत दाखवले.

नोव्हेंबर २०२० मध्ये अभिषेक सिंगवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला. यानंतर हा आरोपी नितीन राऊत यांचा मुलगा कुणालसोबत सुरत, मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पोर्ट ब्लेअर यासारख्या शहरात फिरत होता. एका आरोपीला राऊत पितापुत्र मदत करत असून पोलिसांनी त्यांची चौकशी करावी अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली आहे. नितीन राऊत यांच्या शासकीय बंगल्यातही अनेक दिवस या आरोपीला आश्रय देण्यात आल्याचा आरोप ज्वाला यांनी केला. यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याती मागणी ज्वाला यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – शेट्टींचा सरकारला घरचा आहेर

या प्रकरणी कुणाल राऊत यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आरोपांमुळे नागपूर शहरातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

पवारांच्या हातात हात,चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यात सिंघमचा ‘जयकांत शिक्रे’ ठरला चर्चेचा विषय

    follow whatsapp