Pankaja Munde समर्थकांची नाराजी कायम? परळीत वाढदिवसानिमीत्त लागलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांना स्थान नाही

मुंबई तक

• 11:16 AM • 25 Jul 2021

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा २६ जुलैला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात बॅनर लावण्यात आले आहेत. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान नाकारण्यात आल्यामुळे […]

Mumbaitak
follow google news

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा २६ जुलैला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात बॅनर लावण्यात आले आहेत. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.

हे वाचलं का?

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान नाकारण्यात आल्यामुळे पंकडा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेही दिले. परंतू पंकजा मुंडे यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शक्तीप्रदर्शन करत राजीनामे नाकारले होते.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झाले होते;यात तब्बल 73 जणांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामे दिले. यानंतर खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा असा सल्ला पंकजा मुंडेंनी दिला होता.

यानंतर हे प्रकरण काही काळासाठी शांत झालं होतं. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरातील टॉवर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,उड्डाणपूल या ठिकाणी बॅनर लावन्यात आलेत त्या बॅनरवर एकाही नेत्याचा फोटो नसल्याने मुंडे यांच्या समर्थकांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही अशी चर्चा सुरु आहे.

    follow whatsapp