छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेएवढा अन्याय दुसऱ्या कुणीही केला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राविषयी अर्धवट माहिती दिली त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचाही समावेश होतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी?
काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अर्धवट माहिती दिली. काहींनी धादांत खोटी माहिती दिली. श्रीमंत कोकाटे यांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचं राज्य होतं, अशोकाचं राज्य होतं, यादवांचं राज्य होतं. मात्र शिवाजी महाराजांचं राज्य यापेक्षा वेगळं होतं. कारण त्यांचं राज्य कधीही भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा म्हणून ओळखलं गेलं.
Babasaheb Purandare: तरुणांच्या मनावर राज्य करणारे बाबासाहेब पुरंदरे कोण होते?
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला आहे. ज्यांचा मातीशी संबंध आहे असा राजा म्हणजे कुळवाडी भूषण. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा त्यांचं संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय दुसऱ्या कुणीही केला नसेल. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का? याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही. मात्र हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार आधी दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार द्यायचे. २००८ मध्ये समिती सरकारने स्थापन केली. दादोजी कोंडदेव गुरू होते का याचा अभ्यास केला गेला. त्यातून असं समोर आलं की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू किंवा मार्गदर्शक नव्हते. तर जिजाबाई याच त्यांच्या मार्गदर्शक होत्या.
शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय?
शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिली त्या फक्त जिजाऊ माता होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लिखाण आणि जी काही मांडणी केली ती मांडणी आणि तो इतिहास ज्याचा सत्यावर विश्वास आहे असा घटक कधीही मान्य करणार नाही. काही व्यक्तींचं महत्त्व वाढवण्यासाठी पुरंदरे यांनी विशेष काळजी घेतल्याचं दिसून येतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT