ADVERTISEMENT
मुंबईतल्या सरकारी लसीकरण केंद्रांवरची संख्या आता रोडावताना दिसत आहे.
लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे अनेक केंद्रावर गर्दीच होताना दिसत नाहीये
मुंबईच्या दहीसर येथील लसीकरण केंद्रावरचं हे आजचं दृष्य…
एरवी लसकीरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. परंतू अपुऱ्या साठ्यामुळे सध्या फार कमी लोकं केंद्रावर येत आहेत.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी दिवसांमध्ये लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवलंय.
मुंबईतील सर्वच लसीकरण केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात अशाच स्वरुपाचं चित्र पहायला मिळत आहे
लसींच्या अपुऱ्या साठ्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वादही झाले. परंतू प्रत्यक्षात यावर अद्याप काहीच तोडगा निघताना दिसत नाहीये.
ADVERTISEMENT