केंद्र सरकारने १ मे पासून संपूर्ण देशभरात कोरोनाच्या लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा केली. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारनेही कॅबिनेट बैठकीत या वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू राज्यातील लसीच्या तुडवड्यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण सुरु होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
Free Vaccination: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लस देणार!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात लसीता तुटवडा भासत आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये लस नसल्यामुळे लोकांना घरी परतावं लागत आहे. त्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाचा टप्पा १ मे पासून सुरु होण्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी चिंता व्यक्त केली. ४४ वर्षांवरील व्यक्तींसाठीचं लसीकरण मात्र सुरु राहिलं असं टोपे यांनी स्पष्ट केलं. “आपल्याला लसीचा साठा लगेच उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे १ मे पासून लगेच लसीकरणाला सुरुवात होणार नाहीये. १८ ते ४४ वयोगटातील लोकांनी थोडं सबुरीने घ्यावं. या वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करता येणं शक्य नाहीये. त्यामुळे या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचं नियोजन करणं गरजेचं आहे.”
…किर्तीरुपी उरावे ! माझं जगून झालंय म्हणत संघ स्वयंसेवकाने ऑक्सिजन बेड गरजूसाठी केला रिकामा
१ मे पासून लसीकरणाचा टप्पा सुरु होत आहे म्हणल्यावर अनेक लोकं लसीकरण केंद्रावर गर्दी करण्याची शक्यता आहे. परंतू १८ ते ४४ वयोगटातील लोकांनी थोडं सबुरीने घेण्याची गरज आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी वेगळ्या केंद्राची उभारणी करण्यात येईल, तिकडेच या नागरिकांचं लसीकरण होईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. तसेच लसीकरणासाठी जाताना कोविन App च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन होणं गरजेचं असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. येत्या ६ महिन्यांमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचं ध्येय राज्य सरकारने ठेवलं असून राज्याला जसा जसा लसींचा डोस मिळेल तसं तसं नागरिकांना लस दिली जाईल असंही टोपे म्हणाले.
ADVERTISEMENT