Mumbai : “मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग”; PM मोदींची बोहरा मुस्लीम समाजाला भावनिक साद

मुंबई तक

10 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:04 AM)

PM Narendra Modi in Mumbai : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार (१० फेब्रुवारी) मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच मरोळमधील अल्जामिया-तुस-सैफीयाह (द सैफी अकादमी) च्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन केलं. यावेळी “मी पंतप्रधान म्हणून नाहीत तर तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे”, असं म्हणतं पंतप्रधान मोदींनी समुदायाच्या सदस्यांना भावनिक […]

Mumbaitak
follow google news

PM Narendra Modi in Mumbai :

हे वाचलं का?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार (१० फेब्रुवारी) मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच मरोळमधील अल्जामिया-तुस-सैफीयाह (द सैफी अकादमी) च्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन केलं. यावेळी “मी पंतप्रधान म्हणून नाहीत तर तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे”, असं म्हणतं पंतप्रधान मोदींनी समुदायाच्या सदस्यांना भावनिक साद घातली. (‘I’m your family member’: PM Modi inaugurates Mumbai campus of Dawoodi Bohra institute)

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा जेव्हा मी तुमचे व्हिडिओ आणि चित्रपट पाहिले, त्यावर माझी एकच तक्रार आहे. तुम्ही मला त्यात “आदरणीय पंतप्रधान” म्हटलं. पण मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. मी भाग्यवान आहे की मी ४ पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. चारही पिढ्यांनी माझ्या घरी भेट दिली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“प्रत्येक वेळी मला कुटुंबातील सदस्य म्हणून इथे येण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे मला आनंद झाला. याशिवाय जेव्हा मी देशात कुठेही किंवा अगदी परदेशात जातो तेव्हा माझे बोहरा बंधू आणि भगिनी मला भेटायला येतात, ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी त्यांचं भारताबद्दलचं प्रेम आणि काळजी नेहमीच दिसून येते, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

अल्जामिया-तुस-सैफियाह ही दाऊदी बोहरा समाजाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सैफी अकादमी समुदायाच्या शिक्षण परंपरा आणि साक्षरता संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. दाऊदी बोहरा समुदाय हा शिया इस्लामिक पंथातील एक उपसमूह आहे जो त्यांच्या व्यावसायिक कौशल्यासाठीही ओळखला जातो. याच समजासोबत जवळचा संबंध असल्याचं मोदी सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच दाऊदी बोहरा समाजाच्या नवीन अकादमीचं उद्घाटन करुन अकादमीचा दौराही केला.

    follow whatsapp