Aishwarya Rai Tax: ऐश्वर्याने थकवला TAX, किती भरावी लागणार रक्कम?

मुंबई तक

17 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:55 AM)

Aishwarya Rai Bachchan gets notice for not paying tax: नाशिक: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तहसीलदारांनी अकृषक कराचा भरणा न केल्याने ऐश्वर्या रायला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता ऐश्वर्याला जमिनीचा कर (Land Tax) भरावा लागणार आहे. अन्यथा तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाशिक […]

Mumbaitak
follow google news

Aishwarya Rai Bachchan gets notice for not paying tax: नाशिक: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तहसीलदारांनी अकृषक कराचा भरणा न केल्याने ऐश्वर्या रायला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता ऐश्वर्याला जमिनीचा कर (Land Tax) भरावा लागणार आहे. अन्यथा तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे वाचलं का?

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आडवाडी शिवार येथील जमिनीचा 21 हजार 960 रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस 9 जानेवारी रोजी काढण्यात आलेली आहे. पण ऐश्वर्या राय-बच्चन हिला ती नोटीस मिळाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

सिन्नरमधील ठाणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 एकर एवढी प्रचंड जमीन आहे. याच जमिनीचा एक वर्षाचा कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती आता समोर आली आहे. ऐश्वर्यासोबतच सिन्नर तालुक्यातील इतरही 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

ऐश्वर्या राय पुन्हा का झाली ट्रोल?

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ऐश्वर्याने सुझलॉन या पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या बरोबर अनेक सेलिब्रिटींनी सुझलॉन या पवन ऊर्जा कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती आहे.

Panama Papers Leak: ऐश्वर्या राय बच्चनला ED ने बजावलं समन्स, पण…

बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा. लि., मेटकोन इंडिया प्रा. लि., छोटाभाई जेठाभाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लिमिटेड, एल बी कुंजीर इंजिनिअर, एस. के. शिवराज, आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट प्रा. लि., कुकरेजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात, रामा हँडिक्राफ्ट, अल्ग्रो व्हेंचर्स लिमिटेड या कंपन्यांना देखील महसूल विभागाने कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी ऐश्वर्या राय कर केव्हा भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसं न केल्यास प्रशासन तिच्यावर नेमकी काय कारवाई करणार असाही सवाल आता अनेक जण विचारत आहेत.

    follow whatsapp