पुणे पोलिसांना गुंगारा देऊन साताऱ्यातील जावळी भागात मेढा येथे लपलेल्या गजा मारणेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील मेढा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रात्री कारवाई करत गजा मारणे व त्याच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली. या कारवाईत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांना गजा मारणेने कडक सॅल्युटही मारला.
ADVERTISEMENT
मारणे व त्याच्या तीन साथीदारांना पकडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. यावेळी मारणेने अमोल माने यांना, ३ पोलीस कमिशनर, SP ना मी सापडलो नाही. पण इतक्या अंधारातही तुम्ही मला ओळखलंत. खरंच मानेसाहेब तुम्ही ग्रेट आहात असं म्हणत गजा मारणेने पोलिसांना सॅल्युट मारला.
गजा मारणेविरोधात दरोड्याचा गुन्हा, पैसे न देता वडापाव घेणं भोवलं
अटक झाल्यानंतर गजा मारणेची रवानगी पुन्हा एकदा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. पुणे पोलिसांना गुंगारा देऊन गजा मारणे मेढा परिसरात आपल्या क्रेटा गाडीतून फिरत होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अमोल माने आणि त्यांच्या पथकाने रात्री मारणेच्या गाडीचा पाठलाग करत ही कारवाई केली. खून खटल्यातून सुटका झाल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे पर्यंत त्याची जंगी मिरवणूक काढली होती. यावेळी ५०० गाड्यांचा ताफा मारणेसोबत हजर होता. याच शक्तीप्रदर्शनामुळे मारणेविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला.
ADVERTISEMENT