महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. दिवसभरात राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 26 रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
कुठे कुठे आहेत हे 26 रूग्ण?
मुंबई -11
रायगड-5
ठाणे-4
नांदेड-2
नागपूर-1
पालघर-1
भिवंडी-1
पुणे ग्रामीण-1
एकूण- 26
आज आढळलेल्या ओमिक्रॉनच्या 26 रूग्णांमुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 167 झाली आहे. हे 167 रूग्ण कुठे किती आहेत जाणून घ्या.
लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे आता 167 रूग्ण
मुंबई-84
पिंपरी-19
पुणे ग्रामीण- 17
पुणे महापालिका-7
ठाणे-7
सातारा-5
उस्मानाबाद-5
पनवेल-5
नागपूर-3
कल्याण डोंबिवली-2
औरंगाबाद-2
नांदेड-2
बुलढाणा-1
लातूर-1
अहमदनगर-1
अकोला-1
वसई-1
नवी मुंबई-1
पालघर-1
मीरा भाईंदर-1
भिवंडी-1
एकूण-167
नागपूरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रूग्ण दुबईहून नागपूरला आला. एका 29 वर्षीय महिलेचा रिपोर्ट ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला दुबईहून नागपूरला आली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून काही दिवस आधी नांदेडमध्ये आलेल्या एकाच परिवातील तिघांपैकी दोन जण ओमीक्रॉंन बाधित, हिमायतनगर इथे गत आठवड्यात परतले होते. या दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे असंही सांगण्यात आलं आहे.
Coronavirus Updates : डेल्टापेक्षा वेगाने पसरतोय ओमिक्रॉन, WHO ची माहिती
आज आढळलेल्या 26 रूग्णांची माहिती
आज आढळलेल्या 26 ओमिक्रॉन रूग्णांपैकी 14 पुरूष आहेत तर 12 स्त्रिया आहेत. 26 पैकी 24 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर दोन जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 18 वर्षांखालील चारजण आहेत ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. तर इतर तिघांचही लसीकरण झालेलं नाही. उर्वरित 19 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 24 पैकी 21 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत तर उर्वरित पाचजणांना सौम्य लक्षणं आहेत.
राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 743 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 98 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
ADVERTISEMENT