जगातील अनेक देशांत प्रार्दुभाव झालेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारताचीही चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या देशातील रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे. देशात रविवारी 17 ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे. यापैकी 8 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
ADVERTISEMENT
रविवारी देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 5 वरून थेट 21 वर पोहोचली. देशात एकाच दिवशी 17 प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं. यात महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थानमध्ये रुग्णांचा समावेश असून, सर्वाधिक रुग्ण राजस्थानात आढळून आले आहेत.
रविवारी दिल्लीत एका प्रवाशाला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेले सात रुग्ण आढळून आले. राजस्थानमध्ये नऊ कोविड रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला असून, एकाच दिवशी रुग्णसंख्येत 17 ने वाढ झाली आहे. आतापर्यंत देशातील कर्नाटक, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
Omicron Variant : कोरोना होऊन गेलेल्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो?
टांझानियातून दिल्लीत परतलेल्या एका प्रवाशाला कोविडची लक्षणं दिसून आली. त्याच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आले होते. त्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं निदान झालं. या रुग्णाला दिल्लीतीलच लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
Omicron : महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण
दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानमधील जबलपूर येथे परतलेल्या एका कुटुंबातील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आले होते. रिपोर्टमध्ये त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
ओमिक्रॉनचा धोका ओळखून केंद्र सरकारकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत दक्षता घेतली जात आहे. राज्यानांही तसं निर्देश दिलेले आहेत. विमानतळांवर प्रवाशांच्या चाचण्या करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन सर्व बाबींची पाहणी केली.
Covid Omicron Variant : ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात?
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 वर
राज्यातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 8 झाली आहे. 24 नोव्हेंबर 2021 ला नायजेरियातल्या लेगॉस शहरातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेसह तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांना ओमिक्रॉनची लागण झाली. तर पुणे शहरातील एका 47 वर्षीय पुरुषाला व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचा अहवाल मिळाला आहे.
ADVERTISEMENT