मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत आणि ही वाढ नक्कीच धडकी भरवणारे आहेत. आज राज्यात आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत ज्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब ही की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कारण आठपैकी सात रुग्ण हे मुंबईतच सापडले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढला
आतापर्यंत मुंबईत 12, चिंचवडमध्ये 10, पुण्यात 2 आणि डोंबिवलीत एक रुग्ण आढळून आला आहे. ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत गेले तर महाराष्ट्रात लॉकडाऊन देखील लागू शकतो. त्यामुळे आता ही रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवून पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी ठाकरे सरकारला घ्यावी लागणार आहे.
राज्य सरकारने आपल्या वतीने विमानतळावर निश्चितच कठोर नियम केले आहेत, जोखीम असलेल्या देशांसाठी क्वारंटाईनबाबतही सांगण्यात आले आहे. परंतु तरीही महाराष्ट्रातच सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त आता दिल्ली, राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे.
राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आले असून, राजधानीत ओमिक्रॉनने संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 6 झाली आहे. राजस्थानमध्येही आज (14 डिसेंबर) चार रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
तिथेही या नव्या व्हेरिएंटने सरकारला चिंतेत टाकले आहे. देशातील एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत 61 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
सरकारकडून सातत्याने माहिती दिली जात आहे. तसेच लसीकरणाला गती देण्यावरही भर दिला जात आहे. मात्र दरम्यान, देशात ओमिक्रॉनचा धोकाही वेगाने पसरत आहे.
व्ही. के. पॉल यांच्या वक्तव्याने चिंता वाढली
दरम्यान, व्ही. के. पॉल यांच्या एका वक्तव्याने चिंता वाढली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभावही कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत भविष्यात आणखी लसींची गरज भासू शकते, असेही ते म्हणाले.
काही काळापूर्वी, यूकेमधील तज्ज्ञांनी असेही म्हटले होते की, कोव्हिशील्ड लस ओमिक्रॉन विरूद्ध कमी प्रभावी आहे. WHO ने हे देखील मान्य केले आहे की कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट लसीचा प्रभाव कमी करु शकतो. अशा परिस्थितीत खबरदारी आणि सोशल डिस्टन्सिंगवर या गोष्टींवरच भर देणं गरजेचं आहे.
Covid 19 : महाराष्ट्रात आज दिवसभरात 684 रूग्णांचं निदान, 24 मृत्यूंची नोंद
ओमिक्रॉन व्हेरिएंट हा जगात पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेत आढळून आला आहे. तेथील बहुतेक रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटनेच बाधित असल्याचं दिसून आलं आहे. यानंतर, या व्हेरिएंटने यूकेमध्येही कहर केला आहे. तिथे या व्हेरिएंटची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT