Omicron आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो – WHO ची माहिती

मुंबई तक

• 02:37 AM • 02 Dec 2021

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या जगाची झोप उडाली आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने चिंतेत भर घालणारी एक माहिती दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान २३ देशांमध्ये नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. आगामी काळात हा प्रसार आणखीन वाढू शकतो असंही गेब्रेयेसू म्हणाले. दरम्यान नवीन […]

Mumbaitak
follow google news

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या जगाची झोप उडाली आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने चिंतेत भर घालणारी एक माहिती दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान २३ देशांमध्ये नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. आगामी काळात हा प्रसार आणखीन वाढू शकतो असंही गेब्रेयेसू म्हणाले.

हे वाचलं का?

दरम्यान नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही आता सावध पावलं उचलत बाहेरील देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी निर्बंध कडक केले आहेत. जोखीम असलेल्या (At Risk) देशांमधून काल दिवसभरात भारतात विविध राज्यात ११ आंतरराष्ट्रीय उड्डाणं आली आहेत. ज्यात ३ हजार ४७६ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांच्या RTPCR चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात ६ प्रवासी कोविड पॉजिटीव्ह असल्याचं कळतंय.

बाधित रुग्णांचे नमुने हे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यानंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे की नाही हे समजेल.

दरम्यान ज्या दक्षिण आफ्रिकेत हा ओमिक्रॉन व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला गेला. तिकडेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात दक्षिण आफ्रिकेत कोविड रुग्णांची संख्या ५७१ % नी वाढली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून, केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्रवाशांचा सर्व प्रवास इतिहास तपासला जात आहे. भारताने १५ डिसेंबरपासून सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती. पण ओमिक्रोम व्हायरस पसरल्यामुळे आज हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सर्व राज्यांमध्ये, कोविड पॉझिटिव्ह रुग्ण, विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवासी, त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत.

    follow whatsapp