देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग दिला जात असून, आता लसीच्या परिणामकारकतेबद्दल नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याची लसीची शक्ती भविष्यात कमी होऊ शकते, असं सांगत नवीन लसीची गरज पडू शकते असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
डॉ. व्ही.के. पॉल हे नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना लसीबद्दल बोलताना त्यांनी चिंता वाढणारी शक्यता व्यक्त केली आहे. पॉल म्हणाले, ‘असं होऊ शकतं की, बदलत्या काळानुसार आपली लस कुमकुवत ठरेल. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाच्या नव्या व्हेरिेएंटवरही परिणामकारक ठरेल अशा लसीची गरज आहे. कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करायचा असेल, तर औषध निर्माणासंदर्भात मजबूत धोरणाची गरज आहे, त्याचबरोबर वैज्ञानिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक व्हायला हवी, असंही ते म्हणाले.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रचंड झपाट्याने पसरतो आहे-WHO प्रमुख
देशातील ओमिक्रॉनचा धोका वाढला…
देशातील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच डॉ. पॉल यांनी हे विधान केलं आहे. मागील काही दिवसांपासून देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असून, ही सख्या आता 61 वर पोहोचली आहे.
Omicron: महाराष्ट्रात ओमिक्रॉनने भरवली धडकी, दिवसभरात सापडले 8 नवे रुग्ण;
पुन्हा लॉकडाऊन?
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे. यातील काही रुग्ण बरेही झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या 28 झाली आहे. तर त्यापाठोपाठ राजस्थान 17 रुग्ण, कर्नाटक 3 रुग्ण, गुजरात 4 रुग्ण, केरळ 1 रुग्ण आंध्र प्रदेश 1 रुग्ण, दिल्ली 6 रुग्ण, चंदीगड 1 रुग्ण अशा स्वरूपात रुग्ण आढळून आले आहेत.
ADVERTISEMENT