जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला, न्यूयॉर्कमधली घटना

मुंबई तक

• 04:02 PM • 12 Aug 2022

जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली आहे. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले आहेत. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला आहे. बफेलोजवळ चौटोका या ठिकाणी सलमान रश्दी हे व्याख्यान देण्यासाठी गेले होते. तिथे स्टेजवर बसलेले असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात […]

Mumbaitak
follow google news

जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली आहे. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले आहेत. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला आहे. बफेलोजवळ चौटोका या ठिकाणी सलमान रश्दी हे व्याख्यान देण्यासाठी गेले होते. तिथे स्टेजवर बसलेले असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे सलमान रश्दी वादात

द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. १९८० च्या दशकात हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. मुस्लिम समाजात या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. सलमान रश्दी हे जागतिक किर्तीचे लेखक आहेत. त्यांना बुकर या सर्वोच्च सन्मानानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क येथील बफेलो या ठिकाणी चौटाउक्वा या ठिकाणी लेक्चर देण्यासाठी सलमान रश्दी पोहचले होते. त्यांचं व्याख्यान सुरू व्हायचं होतं त्यामुळे ते स्टेजवर बसले होते. त्यावेळी सलमान रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. द सॅनेटिक वर्सेज या पुस्तकामुळे सलमान रश्दी यांना इराणकडून जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ८० च्या दशकात ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर ३३ वर्षांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

दिल्ली येथे स्थित असलेले ब्रिटीश लेखक विल्यम डेलरिंपल यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. मला आशा आहे की यामध्ये सलमान रश्दी हे फार जखमी झाले नसतील अशी आशा करतो. जेव्हा सलमान रश्दी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा सलमान रश्दी फरशीवर कोसळले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातल्या हल्लेखोराला ताब्यात घेतलं. सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते ७५ वर्षांचे आहेत. मागच्या २० वर्षांपासून सलमान रश्दी अमेरिकेत वास्तव्य करत आहेत.

    follow whatsapp