Palghar : शिकार करायला गेले आणि रानडुक्कर समजून आपल्याच दोन साथीदारांना गोळ्या...

नकळत झालेल्या या घटनेमुळे बिथरलेल्या शिकाऱ्यांनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना घटनेची तक्रार करण्याऐवजी मृताचा मृतदेह झुडपात ओढला आणि लपवून ठेवला.

Mumbai Tak

मुंबई तक

06 Feb 2025 (अपडेटेड: 06 Feb 2025, 09:31 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पालघर जिल्ह्यातील धक्कादायघटना

point

गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर

Palghar News : पालघर जिल्ह्यात शिकार करताना घडलेल्या एका घटनेमुळे सगळेच हादरले. जंगलात शिकार करायला गेलेल्या गावकऱ्यांनी चुकून आपल्याच एका साथीदाराला रानडुक्कर समजून गोळी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 28 जानेवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेत एक जण जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण

पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) अभिजीत धार्षिवकर यांनी सांगितलं की, गावकऱ्यांचा एक गट जिल्ह्यातील मनोर येथील बोरशेटी जंगलात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेला होता. यावेळी शिकारीदरम्यान काही गावकरी गटापासून वेगळे झाले. काही वेळाने, एका शिकाऱ्याने रानडुक्कर समजून गोळीबार केला, ज्यामध्ये दोन गावकरीच जखमी झाले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर मृतदेह लपवण्यात आला?

नकळत झालेल्या या घटनेमुळे बिथरलेल्या शिकाऱ्यांनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना घटनेची तक्रार करण्याऐवजी मृताचा मृतदेह झुडपात ओढला आणि लपवून ठेवला. धाराशिवकर म्हणाले, 'माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या सहा ग्रामस्थांना ताब्यात घेतलं. बुधवारी शोध घेतल्यानंतर, अधिकाऱ्यांना  कुजलेला मृतदेह सापडला आणि मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हे ही वाचा >>Crime News: बापच निघाला हैवान पोटच्या दोन चिमुकल्या लेकरांना थेट...

आता अशी माहिती समोर आली आहे की, गोळीबारात जखमी ग्रामस्थाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना माहिती न देता त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.

    follow whatsapp