पुणे: पुण्यात एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणात सांगितले होते की, मी सदैव जनतेच्या संपर्कात राहिल. त्यानुसार मागील तीन चार दिवसापासून फोनवरून कामे मार्गी लावतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, आपल्याला माहिती नाही हे मी सुरवातीपासून करत आलेलो आहे, मी फक्त असं कॅमेरे बिमारे लावत नाही.
ADVERTISEMENT
मी आपल काम करीत असतो. तुम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. मी कुठला ही फोन आला की लाव फोन लगेच म्हणत असतो. परंतु फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव अस सांगत नाही असे म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायती यांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आहे. ओबीसी समाजाचा आरक्षणचा प्रश्न मार्गी न लावता, या निवडणुका होत आहेत, पण या समाजाच्या आरक्षणचा देखील यामध्ये समावेश केला पाहिजे. मात्र हा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर 12 तारखेला निकाल आहे.
उत्तर प्रदेशाप्रमाने निकाल लागला पाहिजे. तसे झाल्यास ओबीसी समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश करूनच निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
पक्षांतर बंदी कायदा आला. त्यावेळी त्यामध्ये कसे बदल झाले. त्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तसेच मध्यंतरी ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यावर उद्या 11 तारखेला कोर्टात निकाल लागणार आहे. त्याकडे संपूर्ण महाराष्ट्रच लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच मूळची शिवसेना आहे असं त्यांचं ही म्हणण आहे.
आम्हाला देखील दिसताना तसंच दिसत आहे. निकाल कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर दोन्ही बाजूने लोक बोलत असतात. काही जण म्हणतात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, मी देखील अनेक वकील मंडळी सोबत चर्चा केली. ते म्हणतात की, पक्षांतर बंदी कायद्याचं तंतोतंत पालन करायच झाल्यास, 16 व्यक्तींबाबत निकाल वेगळा लागला पाहिजे असे मत विरोधी पक्ष नेत्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरु होता, अनेक ठिकाणी पुर आला होता. यावेळी एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून फोनवरुन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. आदेश देतानाचे दोन व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटरवरती टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
ADVERTISEMENT