Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन भाजप-शिवसेना आमनेसामने… नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 10:53 AM • 10 Jun 2021

निलेश पाटील नवी मुंबई: सुमारे 900 हेक्टर जमीन संपादित करून तब्बल सोळा हजार रुपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai indternational Airport) प्रस्तावित निर्मिती सिडको (Cidco) व शासनामार्फत होत आहे. या विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यास विरोध करत ठाणे बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी […]

Mumbaitak
follow google news

निलेश पाटील

हे वाचलं का?

नवी मुंबई: सुमारे 900 हेक्टर जमीन संपादित करून तब्बल सोळा हजार रुपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai indternational Airport) प्रस्तावित निर्मिती सिडको (Cidco) व शासनामार्फत होत आहे. या विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यास विरोध करत ठाणे बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी अभिनव आंदोलन पुकारून या नावाला तीव्र विरोध केला. दरम्यान, यामुळे नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

या विमानतळाला स्वर्गीय दि. बा.पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्यासाठी भूमिपूत्र ठाम आहेत. या आंदोलनानंतर 24 जून रोजी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची प्रत्येक पायरीवर कोंडी करायची असा जणू विडाच दिल्लीने उचललेला दिसतो: शिवसेना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण केंद्रीय कृती समिती आणि नवी मुंबई शहरातील समितीने आंदोलनाची हाक दिल्यावर भूमिपुत्रांनी हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापूर येथे मुख्य रस्त्यावर पारंपरिक वेशभूषा परिधान करून आंदोलक रस्त्यावर मानवी साखळी उभारून सरकारचा निषेध करत होते.

सुमारे तीन तास निषेधाचे फलक हाती घेवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दि. बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे ही मागणी करण्यात आली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं असं आशिष शेलार का म्हणाले?

येत्या 24 जून रोजी सिडको मुख्यालयास घेराव घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनाचे पडसाद शेजारच्या रायगड ग्रामीण व ठाणे ग्रामीण भागात देखील उमटल्याने स्थानिक भूमिपुत्र या चळवळीत सहभागी होत आहेत.

यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आमदार रमेश पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत या बड्या भाजप नेत्यांनी पूर्ण वेळ आंदोलनात सहभाग घेतला.

भाजप-सेना सत्तेवर असताना औरंगाबादचं नामांतर का नाही?-राज ठाकरे

विमानतळ धावपट्टीवर दि. बा.पाटील यांची आद्याक्षरे रचून मानवी साखळी बनवण्यात आली होती. महिला देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

    follow whatsapp