उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली तर त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरासह सर्व धार्मिक स्थळ दर रविवारी बंद राहणार असून इतर दिवसांत सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशा बारा तासांमध्ये भाविकांसाठी खुली राहणार आहेत. याचसोबत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता तुळजाभवानी मंदिरात फक्त ५ हजार भाविकांनाच दर्शनाची परवानगी मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलंय. मास्क घालून न येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या आवारात प्रवेशच दिला जाणार नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन दिवेगावकर यांनी केलंय.
ADVERTISEMENT
वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात या गोष्टी बंद राहणार –
-
चहाची दुकानं आणि पानाच्या टपऱ्या
-
शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग क्लास
-
खेळाची मैदानं, योग क्लास, जिम, जलतरण तलाव
-
सार्वजनिक बगिचे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत सुरु, नंतर बंद. संध्याकाळी सात नंतर बगिच्यात कोणी आढळलं तर १ हजारांचा दंड
-
मंगल कार्यालयं, लॉन्स बंद
-
पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व आठवडी बाजार बंद
-
सभा, मेळावे, संमेलनं घेण्यास बंदी
-
लग्नसोहळ्याला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी फक्त २० जणांना परवानगी
-
हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृह संध्याकाळी सातपर्यंत सुरु त्यानंतर फक्त पार्सल सुविधा मिळेल
उस्मानाबाद जिल्हयात रात्रींची संचारबंदी कायम असणार असून रात्री ७ ते पहाटे ५ या वेळेत कोणालाही बाहेर फिरत येणार नाही. या काळात अत्यावश्यक सेवा व सुविधा मात्र सुरु राहतील. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या गेल्या ७२ तासात संपर्कात आलेल्या ८० टक्के व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण अधिक सापडत आहेत त्या भागात कंटेनमेंट झोन तयार करण्याचे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले आहेत. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम , मास्क , सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : भाजपचा उमेदवार ठरला, समाधान आवताडेंना मिळालं तिकीट
ADVERTISEMENT