केदारनाथ मंदिराबाहेर पुजारी रात्री का देत आहेत ‘पहारा’?; महाराष्ट्राशी कनेक्शन

मुंबई तक

• 12:47 PM • 17 Sep 2022

जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा थर चढवण्याला असलेला विरोध आता तीव्र होत आहे. केदारनाथ धामच्या पुजाऱ्यांना भीती वाटत आहे की, मंदिर समिती रात्रीच सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम करू शकते, यासाठी आता पुजारी रात्रीच्या वेळीही मंदिराबाहेर पहारा देत आहेत. केदारनाथ मंदिराच्या आतील भागात म्हणजेच गर्भगृहात सोन्याचा थर चढवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रातील एका मोठ्या देणगीदारानं मांडला आहे. मंदिराच्या […]

Mumbaitak
follow google news

जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा थर चढवण्याला असलेला विरोध आता तीव्र होत आहे. केदारनाथ धामच्या पुजाऱ्यांना भीती वाटत आहे की, मंदिर समिती रात्रीच सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम करू शकते, यासाठी आता पुजारी रात्रीच्या वेळीही मंदिराबाहेर पहारा देत आहेत.

हे वाचलं का?

केदारनाथ मंदिराच्या आतील भागात म्हणजेच गर्भगृहात सोन्याचा थर चढवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रातील एका मोठ्या देणगीदारानं मांडला आहे. मंदिराच्या या भागात आधीपासून 230 किलो चांदीचा थर आहे. सध्या चांदीचे थर काढून तांब्याचा थर लावून चाचणी सुरू झाली आहे. केदारनाथ धामचे पुजारी त्याचा निषेध करत आहेत.

बाबा केदारनाथचे धाम, मोक्षाचे धाम

पुजारी केदारनाथ धाम हे मोक्षधाम असल्याचे सांगत आहेत. सोन्या-चांदीच्या दर्शनासाठी नव्हे तर मोक्षप्राप्तीसाठी बाबा केदारचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतात. मंदिराच्या गर्भगृहात सोन्या-चांदीचा मुलामा चढवून पौराणिक परंपरा खेळल्या जात आहेत. आजपर्यंत येथे सोने नसल्याने भाविक दर्शनासाठी येत नव्हते. बद्री-केदार मंदिर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात पत्र पाठवण्यात आल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. मंदिराच्या गर्भगृहात सोने अर्पण करण्याचे काम थांबवावे, अशी मागणी केली आहे.

केदारनाथ मंदिरात कोणत्याही परिस्थितीत सोन्याचा थर नाही चढणार

मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा थर कोणत्याही परिस्थितीत अर्पण करू दिला जाणार नाही, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. धामचे पुजारी अंकुर शुक्ला यांचे म्हणणे आहे की, जबरदस्तीने काम केल्यास त्याला विरोध केला जाईल. त्यामुळे यात्रेकरू पुजारी रात्रीही मंदिराबाहेर पहारा देत आहेत.

बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, मंदिराच्या गर्भगृहात कोणतीही छेडछाड केली जात नाही. सध्या मंदिराच्या गर्भगृहात चांदीचे थर आहेत, ते काढून सोन्याचे थर लावले जात आहेत. त्याला विरोध नाही. काही मोजकेच लोक विरोध करत आहेत. मंदिराचे गर्भगृह जेव्हा सोन्याने सजवले जाईल तेव्हा त्याचे दिव्यत्व आणि भव्यता वाढेल.

केदारनाथचे पुजारी उपोषण करण्याच्या तयारीत

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहातील सोन्याच्या सजावटीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्रातील एका दानशूर भक्तानं चांदीच्या जागी सोन्याचा लेप लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यावर बद्री-केदार मंदिर समितीनेही सहमती दर्शवली होती. बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी यासाठी सरकारकडे परवानगी मागितली. मंदिरातील चांदीचा थर काढून टाकल्यानंतर त्यावर चाचणी म्हणून तांब्याचा थर लावला जात आहे. तांब्याचे थर लावून डिझाईन, फिटिंग आदी कामे केली जातील. हे तांब्याचे थर बसताच सोन्याचे थर लावले जातील.

केदारनाथ धामच्या यात्रेकरू पुजाऱ्यांना मंदिरात सोने ठेवणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. हा सोन्याचा थर लावण्यासाठी मंदिराच्या आत ड्रिल मशिनने छिद्रे पाडली जात आहेत. यात्रेकरू पुजाऱ्यांनी मंदिराच्या भिंतींना छेद दिल्याने नाराजी व्यक्त करत आता ते विरोध करत आहेत. गरज पडल्यास याच्या निषेधार्थ उपोषणही केले जाईल, असे यात्रेकरूंचे म्हणणे आहे.

    follow whatsapp