Tricolour: Pandharpur विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची सजावट

मुंबई तक

• 04:15 AM • 15 Aug 2021

75 व्या  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक अश्या तिरंगी फुलांची सजावट केलेली आहे. देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळाखांभी मंडप हे सगळं शेवंती, कामिनी, झेंडूची फुले, तसेच तुळस यासह अन्य 700 किलो फुलांचा वापर करून सजविण्यात आलं आहे. या फुलांच्या सजावटीत विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा साज घालण्यात […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

75 व्या  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक अश्या तिरंगी फुलांची सजावट केलेली आहे.

देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळाखांभी मंडप हे सगळं शेवंती, कामिनी, झेंडूची फुले, तसेच तुळस यासह अन्य 700 किलो फुलांचा वापर करून सजविण्यात आलं आहे.

या फुलांच्या सजावटीत विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा साज घालण्यात आला असून गळ्यात तिरंगी उपरणे घालण्यात आले आहे.

भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या पानांनी व फुलांनी केलेल्या सजावटीने विठ्ठल रुक्मिणीचे अनोखे रूप खुलून दिसत आहे.

फुलांच्या सजावटीचे काम पुण्यातील श्रीमंत मोरया प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विठू-रखुमाईला तिरंगी फुलांच्या आरासामध्ये पाहून देवभक्ती व देशभक्तीचा दुहेरी संगम पाहायला मिळतो आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वर्षभरात प्रत्येक सणाचे औचित्य साधून अशाप्रकारे फुलांची सजावट केली जाते.

    follow whatsapp