Beed Lok Sabha Election 2024, pankaja Munde Latest News : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप मुंडे कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी देणार आहे. मात्र, त्या उमेदवार प्रीतम मुंडे नसतील, याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रीतम मुंडेंऐवजी भाजप पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT
लोकमत वृत्तपत्रात विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडे यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत आहे. सध्या त्यांनी मतदारसंघात बैठका आणि भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्या तयारीला लागल्याचे म्हटले जात आहे.
प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट?
वृत्तानुसार बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे वेगळ्या पद्धतीने राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली असून, पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक धनंजय मुंडेही महायुतीत आलेले आहे. त्यामुळे पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> 'महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती..', वंचितचं 'ते' पत्र जसंच्या तसं...
६ जणांची समिती ठरवणार महाराष्ट्रातील उमेदवार
भाजपने महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी 6 नेत्यांची समिती नेमली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा या समितीत समावेश आहे.
हेही वाचा >> 40 जागांवर एकमत, महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कुणाला?
संभाव्य उमेदवार निश्चित करावे, असे या समितीला सांगण्यात आले आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. त्यात संभाव्य उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली आहे, असे सुत्रांनी सांगितले.
ADVERTISEMENT