जरंडेश्वर साखर कारखान्याच्या जप्तीमागे सबळ कारण-पंकजा मुंडे

मुंबई तक

• 01:00 PM • 02 Jul 2021

जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीने जी जप्ती केली आहे त्यामागे सबळ कारण आहे असं आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एखाद्या यंत्रणेने मंत्रीपदी असलेल्या व्यक्तीची चौकशी केली तर लोकशाही धोक्यात येत नाही उलट जास्त बळकट होते असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या ईडी चौकशी मागे काहीतरी सबळ कारणे आहेत, त्यामुळं त्यांची […]

Mumbaitak
follow google news

जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीने जी जप्ती केली आहे त्यामागे सबळ कारण आहे असं आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एखाद्या यंत्रणेने मंत्रीपदी असलेल्या व्यक्तीची चौकशी केली तर लोकशाही धोक्यात येत नाही उलट जास्त बळकट होते असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या ईडी चौकशी मागे काहीतरी सबळ कारणे आहेत, त्यामुळं त्यांची चौकशी सुरू आहे.असा आरोप भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.तसेच ईडी मंत्र्यांची चौकशी करत असेल तर यामुळे लोकशाही बळकटीकरण होईल.असा टोला देखील त्यांनी अजित पवार यांना लगावला.त्या बीडमधील बँकेच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी माध्यमाशी बोलत होत्या.

हे वाचलं का?

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ईडीच्या चौकशीमध्ये मंत्री असणे आणि मंत्री नसणे, याचा काही संबंध नाही. बँक खात्याच्या व्यवहारासंदर्भातील हे गुन्हे आहेत. त्याच्या मागे काहीतरी कारणे आहेत आणि ते सबळ आहेत. म्हणून त्याची चौकशी सुरू आहे.असे पंकजा मुंडे म्हणाल्या, तसेच ईडीच्या एखाद्या यंत्रणेने, एखाद्या मंत्र्यांची चौकशी केली तर लोकशाही धोक्यात येणार नाही, तर लोकशाही बळकटीकरण होईल.असा टोला देखील पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना लगावला.

काय आहे प्रकरण?

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडणींमध्ये भर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

या साखर कारखान्यावर 2010 मध्ये 78 कोटी 90 लाखांच्या थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्ती आणली होती. त्यानंतर हा कारखाना अजित पवार यांचे मावस भावाच्या कंपनीने लिलावात घेतला. माजी आमदार आणि महसूल मंत्री शालिनीताई पाटील या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका आणि चेअरमनही होत्या. 16 जुलै 2010 हा कारखाना बँकेकडून लिलावात काढण्यात आला. साखर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्रकुमार घाडगे यांच्या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. ज्यानंतर हा लिलाव हेतूपुरस्सर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटीहून कमी होती त्या कंपनीने 60 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला कारखाना कसा विकत घेतला? हा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणी आता चंदक्रांत पाटील यांनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    follow whatsapp