ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असणार आहेत. पराग अग्रवाल हे या जागी बसतील. जॅक डॉर्सी हे त्यांचा उतराधिकारी पराग यांना जबाबदारी देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षापासूनच जॅक डॉर्सी यांनी हे जाहीर केलं होतं की मी लवकरच कंपनी सोडणार आहे. आपल्या पदाचा मी राजीनामा देणार आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया गेल्या वर्षी पासून सुरू होती.
ADVERTISEMENT
हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे की जेव्हा ट्विटर आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करतं आहे. हा सामना कर असताना अनेक इनोव्हेशन करण्यात आले आहेत. ट्विटरनी फेसबुक आणि टिकटॉक यांच्याशी स्पर्धा कायम ठेवली असून 2023 पर्यंत आपला महसूल दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी त्यांनी काही नवे उपाय योजले आहेत.
ट्विटरने एक पत्र जारी केलं आहे. त्यामध्ये डॉर्सी यांनी म्हटलं आहे की त्यांनी कंपनीत मी अनेक पदांवर जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. मी आधी को-फाऊंडर म्हणजे सह संस्थापक म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यानंतर चेअरमनही राहिलो आहे. एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि शेवटी सीईओ पद अशा जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. सीईओ म्हणून 16 वर्षे काम केलं आहे. मात्र आता मी हा निर्णय घेतला आहे की आपण थांबायचं. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझा उत्तराधिकारी म्हणून मी पराग अग्रवाल यांना निवडलं आहे ते आता नवे सीईओ असतील असं डॉर्सी यांनी म्हटलं आहे.
समजून घ्या : Twitter India आणि मोदी सरकारमध्ये नेमका वाद काय? का दाखल झाला FIR?
जॅक डॉर्सी यांनी आपलं पद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं की मी ट्विटर सोडणार आहे. ही कंपनी संस्थापकांच्याही पुढे गेली आहे असं मला वाटत असल्याने मी हा निर्णय घेतला आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पराग अग्रवाल हे सीईओ म्हणून उत्तम काम करतील असा माझा विश्वास आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली कामगिरी उत्तम आहे त्यामुळे सीईओ म्हणून मी त्यांची निवड केली आहे असंही डॉर्सी यांनी म्हटलं आहे.
पराग अग्रवाल यांनी काय म्हटलं आहे?
‘मी नवी जबाबदारी स्वीकारत असताना आपल्याला सगळं जग पाहतं आहे. ही बातमी आल्यानंतर लोक वेगळे विचार प्रदर्शित करणार आहेत. आपल्याला ट्विटरच्या भविष्याची काळजी आहे. आता पूर्ण ताकदीने आपल्या पुढे जायचं आहे. हा एक संकेत आहे की आपण आपल्या कामाचं महत्त्व आहे. ट्विटरची क्षमता आपण जगाला दाखवण्याची वेळ आली आहे. ‘
ADVERTISEMENT