जळगाव : मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमीयोला चपलांचा प्रसाद, चोप देऊन पोलिसांच्या केलं स्वाधीन

मुंबई तक

• 11:03 AM • 15 Mar 2022

जळगावात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमीयोला उपस्थितांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. शाळेकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई न झाल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन या रोडरोमीयोला चपलांनी चोप दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती भागात ही घटना घडली आहे. शाळेची बससेवा बंद असल्यामुळे या विद्यार्थिनी दररोज दोन किलोमीटरचा प्रवास करत शाळेत येत आहेत. […]

Mumbaitak
follow google news

जळगावात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमीयोला उपस्थितांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. शाळेकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई न झाल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन या रोडरोमीयोला चपलांनी चोप दिला आहे.

हे वाचलं का?

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती भागात ही घटना घडली आहे. शाळेची बससेवा बंद असल्यामुळे या विद्यार्थिनी दररोज दोन किलोमीटरचा प्रवास करत शाळेत येत आहेत. यादरम्यान बेटावद खुर्द येथील मुलगा राहुल दुमाले हा विद्यार्थिनींची सतत छेड काढायचा. याबद्दल मुलींनी शाळेत तक्रार दाखल केली होती.

परंतू हा मुलगा शाळेतला नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती. अखेरीस विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर सर्वांनी मिळून या रोडरोमीयोला चांगलीच अद्दल घडवली आहे.

आज सकाळी या मुली शाळेत जात असताना सापळा रचून पालकांनी या मुलाला पकडून चपलांनी चोप दिला. यानंतर या मुलाला बोदवड पोलीस ठाण्यात स्वाधीन करण्यात आलं आहे.

    follow whatsapp