कोरोना संकटात आरोग्यव्यवस्थेचं संकट! अहमदनगरच्या रूग्णालयात मृतदेहाशेजारी रूग्णावर होत आहेत उपचार

मुंबई तक

• 01:05 PM • 27 Apr 2021

राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तसंच बेड्सची कमतरता जाणवतेय. अहमदनगरमध्येही कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असून बेड्सचा तुटवडा भासतोय. अशातच अहमदनगरच्या सिव्हिल रूग्णालयात एकाच बेडवर मृतदेह आणि रूग्ण असल्याचं भीषण चित्र पहायला मिळतंय. अहमदनगरच्या सिव्हिल रूग्णालयात एकाच बेडवर कोरोना रूग्णाचा मृतदेह असून त्याच बेडवर बाधित रूग्णाला ऑक्सिजन लावण्यात आल्याची परिस्थिती उद्भवली आहे. यावेळी […]

Mumbaitak
follow google news

राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तसंच बेड्सची कमतरता जाणवतेय. अहमदनगरमध्येही कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असून बेड्सचा तुटवडा भासतोय. अशातच अहमदनगरच्या सिव्हिल रूग्णालयात एकाच बेडवर मृतदेह आणि रूग्ण असल्याचं भीषण चित्र पहायला मिळतंय.

हे वाचलं का?

अहमदनगरच्या सिव्हिल रूग्णालयात एकाच बेडवर कोरोना रूग्णाचा मृतदेह असून त्याच बेडवर बाधित रूग्णाला ऑक्सिजन लावण्यात आल्याची परिस्थिती उद्भवली आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे सुरक्षितता न बाळगता रूग्णांवर उपचार केले जातायत. रूग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये ही भीषण परिस्थिती असल्याचं समोर आलं आहे.

यवतमाळमध्ये रूग्णसंख्या वाढत असताना खासगी रूग्णालयाकडून होतेय रूग्णांची लूट

कोरोना रूग्णाच्या मृतदेहाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळल्याशिवाय बेडवर ठेवण्यात आलं असून या मृतदेहाच्या बाजूला असलेल्या व्यक्तीवर उपचार केले जात असल्याची काळीज पिळवटून टाकणारी दृश्य आहेत.

संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह

अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात सध्या बेड्सचा तुटवडा जाणवत असून रूग्णांसाठी बेड्स उपलब्ध नाहीत. या परिस्थितीत कोरोनाबाधित रूग्णांना जमिनीवर तसंच स्ट्रेचरवर ठेवून ऑक्सिजन देण्यात येत आहे. परंतु आज रूग्णालयात एकाच बेडवर कोरोना रूग्णाच्या मृतदेहाशेजारी दुसऱ्या रूग्णाला उपचार दिले जात आहेत.

    follow whatsapp