Pune : "शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं मला निलंबित केलं...", PMPL महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न

उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमुळे  मोठी दुर्घटना टळली. या संपूर्ण घटनेमुळे कार्यालयात काहीवेळ मोठा गोंधळ उडाला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Feb 2025 (अपडेटेड: 26 Feb 2025, 12:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

PCMC महिला कंडक्टरचा आत्मदहनाचा प्रयत्न

point

अधिकाऱ्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप

point

शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यानं निलंबन झाल्याचा आरोप

Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळात (PMPL) काम करणाऱ्या एका महिला बस कंडक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला. डेप्युटी चीफ मॅनेजर संजय कुसाळकर यांच्या कार्यालयातच हा आत्महत्येचा प्रयत्न झाला. कुसाळकर यांनी शारिरीक सुखाची मागणी केली आणि त्याला नकार दिल्यानं आपल्याला निलंबित करण्यात आल्याचा आरोप महिला कंडक्टरने केला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Thane Ulhasnagar : उल्हासनगर पोलीस ठाणेत गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, भाजप नेत्याच्या मुलाला क्लिन चीट, प्रकरण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथितरित्या झालेल्या छळाला आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कारवामुळे अस्वस्थ झालेल्या महिलेनं कुसाळकर यांच्या केबिनमध्ये स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. पण तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमुळे  मोठी दुर्घटना टळली. या संपूर्ण घटनेमुळे कार्यालयात काहीवेळ मोठा गोंधळ उडाला होता.

 

दुसरीकडे एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील एका 23 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. आरोपीवर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिचे खासगी फोटो वापरून ब्लॅकमेल करण्याचा आणि धमकावण्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापासून पीडितेचा मानसिक छळ केला जात होता. शेवटी, तिने हिंमत करुन पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर सोमवारी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp