मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं सध्या दिसतं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. पण असं असताना मुंबईकरांना मात्र कोरोनाच संसर्गाचं गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण की, आज (16 मार्च) सकाळी मुंबईच्या दादरमधील जी दृश्य समोर आली आहेत ती अत्यंत धक्कादायक आहेत.
ADVERTISEMENT
गेल्या 24 तासात मुंबईत 1712 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय मुंबईत 13 हजार 309 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र असं असताना देखील मुंबईतील दादर आणि अनेक ठिकाणाच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं दिसत आहे. आज सकाळी दादरमधील मार्केटमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. एकीकडे मुंबईत रुग्ण वाढत असताना गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आता राज्यात प्रशासनाकडून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम 31 मार्चपर्यंत मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी लागू असणार आहेत.
कोरोना व्हायरसबाबत तुमच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं
जाणून घ्या काय-काय असणार आहेत निर्बंध:
1. राज्यातील सर्व सिनेमागृह (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स), हॉटेल्स / रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
-
मास्क न घातलेल्या लोकांना प्रवेश देण्यात येणार नाही. प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं तापमान तपासलं जाईल.
-
योग्य ठिकाणी सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात यावा
-
मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे की नाही, यासाठी माणसं नेमण्यात यावीत.
2. सर्व शॉपिंग मॉलसाठी देखील वरील नियमच लागू असणार आहेत.
3. मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी. याबाबत निर्बंध न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच जिथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं असेल त्या ठिकाणांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल.
4. लग्न समारंभासाठी फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
5. अंत्य संस्कारासाठी फक्त 20 जणांना उपस्थित राहता येणार.
मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना विमानातून खाली उतरवणार-DGCA
6. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी पुढील नियम पाळावेत:
-
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात यावी. यावेळी रुग्णावर आयसोलेशन दरम्यान कोणत्या डॉक्टरकडून उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती देखील कळविण्यात यावी.
-
ज्या घरामध्ये कोरोना रुग्ण आहे तिथे 14 दिवसांसाठी घराबाहेर त्यासंबंधी पाटी लावण्यात यावी.
-
होम क्वॉरंटाइन असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर तसा स्टॅम्प मारण्यात यावा.
-
रुग्णांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर ये-जा करणं शक्यतो टाळावं. मास्कचा वापर काटेकोरपणे करण्यात यावा.
-
वरील नियम मोडल्यास रुग्णांना स्थानिक प्रशासनाकडून तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येईल.
7. अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवेशी संबंधित कार्यालये वगळता इतर सर्व ठिकाणी 50 टक्के क्षमतेने कार्यालये सुरु ठेवावीत.
-
वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य देण्यात यावं.
-
ऑफिसमध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे.
-
नियम मोडणाऱ्या कार्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ADVERTISEMENT