मुंबई: जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर स्थिर असूनही देशातील किंमत सातत्याने वाढत आहे. आज (शनिवार) सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती झालीए वाढ आज पट्रोलचे 37 पैसे तर डिझेल हे 39 पैशांनी महागलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर
मुंबईत आज पेट्रोल 37 पैशांनी महागलं असून आज पट्रोलचे दर हे 37 पैसे आणि डिझेल 39 पैशांनी महागलं आहे. 96.94 प्रति लीटरवर जाऊन पोहचलं आहे. तर डिझेल 39 पैशांनी महागल्याने 88.01 रुपये प्रति लीटर एवढं झालं आहे. दरम्यान, मुंबईत काल (19 फेब्रुवारी) पेट्रोलचे दर हे 96.57 रुपये प्रति लिटर इतके होते. तर डिझेलचे दर हे 87.62 रुपये प्रति लिटर होते.
दुसरीकडे पुण्यात पॉवर पेट्रोलने शंभरी देखील गाठली आहे. याशिवाय साध्या पेट्रोलचे दर हे 96.62 रुपये आणि डिझेल 86.36 रुपये एवढं आहे.
ही बातमी पाहा: पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हाती? हे लोकांना ठाऊक-अजित पवार
गेल्या काही दिवसात सलग वाढणाऱ्या इंधनांच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. एकीकडे रेल्वेच्या वेळांवर अजूनही सर्वसामान्यांसाठी निर्बंध आहेत. तर, दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता खासगी वाहतुकीचा पर्याय लोकांना सुरक्षित वाटतो. पण वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे त्याचे दरही वाढले आहेत. ज्याचा फटका सामान्यांना बसत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इंधनाच्या बदलत्या पर्यायाकडे लक्ष वेधलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना विद्युत इंधनाकडे पर्यायी इंधन म्हणून प्राधान्य देण्याचा सरकार विचार करत असल्याचं म्हटलं होतं. तसंच यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT