फोनवर बोलताना भाई का म्हणाला नाही म्हणून तरुणाला पट्टा आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांची चांगलीच जिरवली आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही गावगुंडांनी एका तरुणाला फोनवर भाई का म्हणाला नाही म्हणून मारहाण करत कुत्र्यासारखी बिस्कीटं खायला लावली होती. यातील तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक करत त्यांचं मुंडन करुन धिंड काढली आहे.
ADVERTISEMENT
आरोपींनी प्रथमेश दबडे या तरुणाला मारहाण करुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या घटनेबद्दल वाकड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. गावगुंडांची ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रशांत आठडवे, आदित्य काटे आणि प्रेम शिंदे या आरोपींना अटक केली आहे.
अटक केल्यानंतर या तिन्ही आरोपींचं मुंडन करुन त्यांच्या हातात बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. या आरोपींवर कठोर कलम लावण्यात आली असून अशा टोळक्यांवर दहशत रहावी यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचंही आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं. या घटनेतला प्रमुख आरोपी रोहन वाघमारे उर्फ गंग्या हा अजुनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भाई का बोलला नाहीस? कुत्र्यासारखं बिस्कीट खायला लावतं गावगुंडांची तरुणाला मारहाण
ADVERTISEMENT