नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ज्या पद्धतीने धक्कातंत्राचा वापर केला. तसाच काहीसा प्रकार आता मोदींनी खाते वाटपात देखील केला आहे. दरम्यान, या खाते वाटपादरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत.
ADVERTISEMENT
यामधील सर्वात मोठा बदल म्हणजे पियुष गोयल यांच्याकडे असणारे रेल्वे मंत्रालय हे अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे हे एकप्रकारे पियुष गोयल यांचं डिमोशनचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे स्मृती इराणी यांच्याकडे असणारं वस्त्रोद्योग खातं हे आता पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांच्याकडे आता फक्त महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही अमित शाह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्रि पदावरुन कॅबिनेटपदी मंत्री मिळालेल्या अनुराग ठाकूर यांना देखील मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना माहिती व प्रसारण मंत्री आणि युवा व क्रीडा मंत्रालय देण्यात आलं आहे.
याशिवाय महाराष्ट्रातून जे चार मंत्री गेले आहेत त्यापैकी नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री (कॅबिनेट), भागवत कराड यांना अर्थ (राज्यमंत्री), भारती पवार यांना आरोग्य (राज्यमंत्री) आणि कपिल पाटील यांना पंचायत राज (राज्यमंत्री) ही खाती देण्यात आली आहेत.
पाहा केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटपात नेमके काय बदल करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी – सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय; अणु ऊर्जा मंत्रालय, अवकाश मंत्रालय, इतर सर्व विभाग जे कोणत्याही मंत्र्याला वाटप केलेले नाहीत.
– केंद्रीय कॅबिनेट मंत्री
-
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
-
अमित शाह – गृह आणि सहकार मंत्रालय
-
नितीन गडकरी- रस्ते वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग
-
निर्मला सीतारमण – अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार
-
नरेंद्र सिंह तोमर – कृषी आणि शेतकरी कल्याण
-
डॉ. सुब्रमण्यम जयशंकर – पराराष्ट्र मंत्रालय
-
अर्जुन मुंडा – आदिवासी कार्यमंत्री
-
स्मृती इराणी – महिला आणि बालविकास मंत्री
-
पियुष गोयल – वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री
-
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
-
प्रल्हाद जोशी – संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाण मंत्री
-
नारायण राणे – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री
-
सर्बानंद सोनोवाल – बंदरे, शिपिंग व जलमार्ग मंत्री; आणि आयुष मंत्री
-
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्यांक कार्यमंत्री
-
डॉ. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्यायमंत्री
-
गिरीराज सिंह – ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री
-
ज्योतिरादित्य सिंधिया – नागरी उड्डाण मंत्री
-
रामचंद्र प्रसाद सिंग – स्टिल मंत्रालय
-
अश्विनी वैष्णव – रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री
-
पशुपति कुमार पारस – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
-
गजेंद्रसिंग शेखावत – जल शक्ती मंत्री
-
किरेन रिजिजु – कायदा आणि न्याय मंत्री
-
राज कुमार सिंह – ऊर्जामंत्री
-
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री, गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री
-
मनसुख मांडवीय – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; आणि रसायन व खते मंत्री
-
भुपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री
-
महेंद्र नाथ पांडे – अवजड उद्योग मंत्री
-
पुरुषोत्तम रुपाला – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
-
जी. किशन रेड्डी – सांस्कृतिक, पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर प्रदेशाचे विकास मंत्री
-
अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री आणि युवा व क्रीडा मंत्री
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
-
इंद्रजीत सिंग – सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री
-
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पीएमओ राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री, अणु उर्जा विभागात राज्यमंत्री; आणि अवकाश राज्यमंत्री
Modi Cabinet: मोदींच्या मंत्रिमंडळात 15 नवे कॅबिनेट मंत्री, कोणाकोणाचं झालं प्रमोशन?
केंद्रीय राज्यमंत्री
-
श्रीपाद नाईक – बंदर, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयात आणि पर्यटन राज्यमंत्री
-
फग्गनसिंह कुलास्ते – स्टील आणि ग्रामविकास मंत्रालयातील राज्यमंत्री
-
प्रल्हादसिंह पटेल – जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
-
अश्विनी चौबे – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातील राज्यमंत्री
-
अर्जुन मेघवाल – संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री
-
व्ही. के. सिंह – रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नागरी उड्डाण मंत्रालयातील राज्यमंत्री
-
कृष्णा पाल – ऊर्जा आणि अवजड उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
-
रावसाहेब दानवे – रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयात राज्यमंत्री
-
रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालयात राज्यमंत्री
-
साध्वी निरंजन ज्योती – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्रामविकास मंत्रालयातील राज्यमंत्री
-
संजीव कुमार बाल्यान – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातील राज्यमंत्री
-
नित्यानंद राय – गृहराज्यमंत्री
-
पंकज चौधरी – अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री
-
अनुप्रिया पटेल – वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
-
एस. पी. सिंह बघेल – कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री
-
राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
-
शोभा करंजदाले – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
-
भानुप्रताप सिंह वर्मा – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
-
दर्शना जरदोश – वस्त्रोद्योग आणि रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री
-
व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र आणि संसदीय कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
-
मिनाक्षी लेखी – परराष्ट्र आणि सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री
-
सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
-
रेणुका सिंह सरुता – आदिवासी कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
-
रामेश्वर तेली – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कामगार आणि रोजगार मंत्रालयात राज्यमंत्री
-
कैलाश चौधरी- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
-
अनुपमा देवी – शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
-
ए. नारायणस्वामी – सामाजिक न्याय मंत्रालयात राज्यमंत्री
-
कौशल किशोर – गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातील राज्यमंत्री
-
अजय भट्ट – संरक्षण आणि पर्यटन मंत्रालयात राज्यमंत्री
-
बी. एल. वर्मा – सहकार आणि पूर्वोत्तर प्रदेशाच्या विकास मंत्रालयात राज्यमंत्री
-
अजय कुमार – गृहराज्यमंत्री
-
देऊसिंह चौहान – संचार (कम्युनिकेशन) मंत्रालयात राज्यमंत्री
-
भागवतनाथ खुबा – नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि रसायन व खते मंत्रालयातील राज्यमंत्री
-
कपिल पाटील – पंचायत राज मंत्रालयातील राज्यमंत्री
-
प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय मंत्रालयात राज्यमंत्री
-
सुभाष सरकार – शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
-
भागवत कराड – अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री
-
डॉ. राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र आणि शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
-
डॉ. भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
-
विश्वेश्वर टुडू – जलशक्ती आणि आदिवासी कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
-
शंतनू ठाकूर – बंदर, शिपिंग व जलमार्ग मंत्रालयात राज्यमंत्री
-
डॉ. मुंजापारा महेंद्रभाई – महिला व बालविकास आणि आयुष मंत्रालयात राज्यमंत्री
-
जॉन बार्ला – अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री
-
डॉ. एल. मुरुगन – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, माहिती व प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री
-
निशित प्रामाणिक – गृहराज्यमंत्री आणि युवा व क्रीडा मंत्रालयात राज्यमंत्री
ADVERTISEMENT