पुणे: पुण्यात (Pune) एका ‘नमो’ भक्ताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांचं छोटेखानी मंदिरच (Temple) उभारलं होतं. जो अक्षरश: राष्ट्रीय पातळीवर देखील चर्चेचा विषय ठरला होता. असं असताना पंतप्रधान कार्यालयातून (PMO) एक फोन जाताच हे मंदिर तात्काळ हटविण्यात आलं असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध परिसरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी पंतप्रधान मोदींच्या मंदिराची उभारणी केली होती. औंध भागातील परिहार चौकात त्यांनी मोदींच्या अर्धपुतळ्याची स्थापना केली होती. त्याचं उद्घाटन देखील त्यांनी मोठ्या थाटामाटात केलं होतं. मात्र, असं असताना आता अचानक एका रात्रीत हे मंदिर हटविण्यात आलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर हे मंदिर हटविण्याची कारवाई करण्यात आली असल्याचं समजतं आहे. छोटेखानी स्वरुपाचं जे मंदिर उभारण्यात आलं होतं त्याच्यासकट मोदींचा अर्धपुतळा देखील काढण्यात आला आहे.
लाखो रुपये खर्च केलेला मोदींचा पुतळा अवघ्या चार दिवसात हटवला!
पिंपरी-चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी जयपूरमधून नरेंद्र मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. याकरिता तब्बल 1 लाख 60 हजार रुपये एवढा खर्च करण्यात आला.
15 ऑगस्ट रोजी म्हणजे रविवारी औंधमधीलच ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं. पण अवघ्या चारच दिवसांच्या आत हे मंदिर आणि पंतप्रधान मोदींचा पुतळा हटविण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करुन उभारलेलं मंदिर हे अवघ्या चारच दिवसात हटविण्यात आल्याने येथील नमो भक्त मात्र नाराज झाले आहेत.
नमो भक्ताने का उभारलं होतं मोदींचं मंदिर?
‘या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदिर उभारलं आहे’, अशी प्रतिक्रिया मयूर मुंढे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. यावेळी या मंदिरात एका मोदींवर रचलेली एक कविता देखील फलकावर लावण्यात आली होती. ज्यामध्ये आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी त्याच्या कवितेच्या आधारे ही मांडण्याचा प्रयत्न केला होता.
तुमच्यासाठी काय पण! पुण्यात ‘नमो भक्ता’ने उभारलं Narendra modi चं मंदिर
भाजप नेते आणि कार्यकर्ते हे नेहमीच पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करतात. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदींची स्तुती करणारं एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये त्यांनी ‘नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार असल्याचं म्हटलं होतं. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे, असं म्हटलं होतं. तर काही दिवसांपूर्वीच केलेल्या ट्विटमध्ये हे मोदी युग सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.
ADVERTISEMENT