ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी (PM Modi) हे रविवारी रात्री सेंट्रल विस्टामधील नव्या संसद भवनच्या कंस्ट्रक्शन साइटवर अचानक पोहचले.
या ठिकाणी त्यांनी नव्या संसद भवनाचं काम नेमकं कसं सुरु आहे याचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी हे 26 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वाजता इथे पोहचले. ते इथे तब्बल एक तासाहून अधिक वेळ होते.
या भेटीची पंतप्रधान मोदींनी कोणालाही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची देखील बरीच भंबेरी उडाली.
या भेटीची पंतप्रधान मोदींनी कोणालाही माहिती दिली नव्हती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची देखील बरीच भंबेरी उडाली.
राजधानी दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल 971 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
या संपूर्ण प्रोजेक्टचं काम हे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला देण्यात आलं आहे. आता स्वत: मोदींनी येथील पाहणी केल्याने हा संपूर्ण प्रोजेक्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT