ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी हे काशीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सर्वात आधी त्यांनी काळभैरव मंदिराचं दर्शन घेतलं.
यानंतर त्यांनी गंगेत पवित्र स्नान केलं. काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोदींनी गंगेत जाऊन स्नान केलं.
पंतप्रधान मोदी हे काशी-विश्वनाथ धामचं लोकार्पण केलं आहे. यावेळी संपूर्ण काशीमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळत होतं.
गंगा स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गंगेत जलापर्ण केलं. त्यानंतर गंगेचं पवित्र जल घेऊन ते काशी विश्वेश्वर मंदिराच्या गर्भगृहात गेले.
11 ब्राम्हणांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी जलाभिषेक आणि पूजा-अर्चा केली.
या पूजेनंतर मोदींनी काशी विश्वेश्वराच्या नव्या धामचं लोकार्पण केलं. यावेळी तब्बल 151 डमरु वादक दल सातत्याने डमरु वादन करत होते.
या भव्य लोकार्पण सोहळ्याला भाजपचे 12 मुख्यमंत्री, 9 उपमुख्यमंत्री, आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित होते.
यावेळी 2500 हून अधिक मान्यवर आणि 500 हून अधिक साधू-संत हे उपस्थित होते. लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितींना संबोधितही केलं.
ADVERTISEMENT