पाकिस्तानी सुपर लिगच्या सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या ७ जणांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. रांजणगावमधील छत्रपती नगरात पोलिसांनी ही कारवाई केली असून हे सातही आरोपी ऑनलाईन सट्टा लावत असल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन सट्टेबाजार चालत होता. परंतू प्रत्येकवेळी छापेमारी करण्याच्या आधी हे सट्टेबाज आपल्या मोबाईलचं सिमकार्ड बदलून सर्व पुरावे नष्ट करायचे. त्यामुळे पोलिसांच्या हातात काहीही लागलं नव्हतं.
IPL 2022: बोली लावली मुंबईने खेळाडू विकला दिल्लीला, लिलावात चारु शर्मांचा घोळ पाहिलात का?
अखेरीस मंगळवारी रात्री मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रांजणगाव परिसरात छापेमारी केली असता ७ सट्टेबाजांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी या सट्टेबाजांकडून मोबाईल, टॅब, रजिस्टर आणि काही रोख रक्कम असा दोन लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. औरंगाबागद क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सट्टेबाज बाहेरील देशांमध्ये चालणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांवरही सट्टा लावायचे.
सध्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
‘या’ महिला क्रिकेटरने केलेलं विराट कोहलीला प्रपोज
ADVERTISEMENT