चिपळूण बाजारपेठेतील ओतारी गल्लीतील सराफ व्यवसायिकाचं अपहरण करून ३ किलो सोने व ९ लाखाची रोकड लुटणाऱ्या पुण्यातील टोळीस अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत ७ आरोपी असून त्यापैकी दोघेजण चिपळूण व खेड येथील आहेत. या आरोपींपैकी काहींवर १० प्रकारचे गुन्हे विविध राज्यात याआधीच दाखल आहेत. त्यांच्याकडून एकूण १ कोटी ६२ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ADVERTISEMENT
सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विशाल रावसाहेब ओहळ, निलेश दिलीप भोईटे, अजय राजू महाजन, रासबिहारी मिताई मन्ना, आसिम करमुद्दीन परकार, एकनाथ कृष्णा आवटे, राजेश रामकृष्ण क्षीरसागर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून दीड कोटींचे सोन्याचे दागिने, कॉइन, ७ लाख ८५ हजार ५०० रूपयाची रोकड, ३ लाख किमतीची होंडा सिव्हिक कार, २ लाखाची टोयाटो कोरोला अलटिस कार, १ हजाराचे एअर पिस्टल व १०० रूपयाचे स्टिल बेडी असा एकूण १ कोटी ६२ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सबंधीत आरोपी हे सराईत असून यापुर्वी त्यांच्यावर महाराष्ट्रात पुणे, बारामती, अकोला, ठाणे, तसेच आसाम राज्यातही विविध १० प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत या टोळीने व्यापाऱ्याचं अपहरण करुन त्याच्याजवळील मुद्देमाल लुटला होता.
बीड : अंबाजोगाईत पोलिसांच्या घरात घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल चोरीला
ADVERTISEMENT