Poll of Polls: मुंबई: गुजरात आणि हिमाचल या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यावेळी या दोन राज्यांमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वेगवेगळ्या चॅनल्सनी आपल्या एक्झिट पोलद्वारे व्यक्त केला आहे. यावेळी इंडिया टुडेने अॅक्सिस माय इंडियाने देखील आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. मात्र याशिवाय इतर चॅनल आणि संस्थाचा देखील नेमका एक्झिट पोल काय आहे ते जाणून घेऊयात सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
त्याचबरोबर देशाच्या अनेक भागात काही जागांवर पोटनिवडणुकाही झाल्या आहेत. याशिवाय संपूर्ण देशाच्या नजरा राष्ट्रीय राजधानी दिल्लीकडे लागल्या आहेत. जिथे महापालिका निवडणुकाही पार पडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 8 तारखेला या निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. पण त्याआधी या सर्व निवडणुकांचे एक्झिट पोल तुम्हाला फक्त मुंबई तकवर पाहता येईल.
दिल्ली महापालिका निवडणूक
आज तक-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल:
-
आप – 149-171 जागा
-
भाजप – 69-91 जागा
-
काँग्रेस – 03-07 जागा
-
इतर – 05-09 जागा
ETG-TNN
-
आप – 146-156 जागा
-
भाजप – 84-94 जागा
-
काँग्रेस – 6-10 जागा
-
इतर – 4 जागा
जन की बात
-
आप – 159-175 जागा
-
भाजप – 70-92 जागा
-
काँग्रेस – 4-7 जागा
TV9
-
आप – 145 जागा
-
भाजप – 94 जागा
-
काँग्रेस – 8 जागा
-
इतर – 3 जागा
गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक
गुजरातमध्ये 1 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले, ज्यामध्ये 788 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. पहिल्या टप्प्यातील 89 जागांवर 60.20 टक्के मतदान झाले होते, तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या जागांवर 68 टक्के मतदान झाले होते. तर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं आहे. त्याची मतदानाची टक्केवारी येणं अद्याप बाकी आहे. 182 सदस्यीय विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान झाले. गुजरातमध्ये अडीच दशकांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील आपली सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल:
-
भाजप – 131-151 जागा
-
काँग्रेस – 16-30 जागा
-
आप – 3-05 जागा
-
इतर – 3-07 जागा
P-MARQ
-
भाजप – 128-148 जागा
-
काँग्रेस – 30-42 जागा
-
आप – 0-01 जागा
TV9
-
भाजप – 125-130 जागा
-
काँग्रेस – 40-50 जागा
-
आप – 3-5 जागा
-
इतर – 3-7 जागा
जन की बात
-
भाजप – 117-140 जागा
-
काँग्रेस – 34-51 जागा
-
आप – 6-13 जागा
हिमाचल प्रदेशात 75.6 टक्के मतदान
गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका एकाच वेळी होतात. पण यावेळी आधी हिमाचलमध्ये आणि नंतर गुजरातमध्ये मतदान झाले. पण दोन्ही राज्यांचे निकाल 8 डिसेंबरलाच जाहीर होणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विक्रमी 75.6 टक्के मतदान झाले होते. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. इथे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपला चुरशीची लढत देत आहेत. हिमाचल प्रदेशचा इतिहास असा आहे की, येथे सरकारची पुनरावृत्ती होत नाही.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक
आज तक-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल:
-
भाजप – 24-34 जागा
-
काँग्रेस – 30-40 जागा
-
आप – 0-0 जागा
-
इतर – 4-8 जागा
P-MARQ
-
भाजप – 34-39 जागा
-
काँग्रेस – 28-33 जागा
-
आप – 0-01 जागा
जन की बात
-
भाजप – 32-40 जागा
-
काँग्रेस – 27-34 जागा
-
आप – 0-0 जागा
-
इतर – 2-1 जागा
ETG-TNN
-
भाजप – 38 जागा
-
काँग्रेस – 28 जागा
-
आप – 0 जागा
-
इतर – 2 जागा
TV9
-
भाजप – 33 जागा
-
काँग्रेस – 31 जागा
-
आप – 0 जागा
-
इतर – 4 जागा
ADVERTISEMENT