सोशल मीडियामुळे कधी कुठली अफवा पसरेल हे काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच अशीच एक बातमी समोर आली होती. मॉडेल आणि पॉर्न स्टार मिया खलिफाच्या मृत्यूची. या बातमीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र मिया खलिफाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तिने एक मीम शेअर केलं आणि सांगितलं की मी जिवंत आहे. सोशल मीडियावर आता तिच्या फनी मीमचीही चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
मिया खलिफाने एक मीम शेअर केलं आहे. या मीमद्वारे तिने मृत्यूबाबतच्या अफवांविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. मी जिवंत आहे आणि खूप मस्त वाटतं आहे, या आशयाचं एक मीम मियाने शेअर केलं आहे. फॅन्सचे मेसेज पाहून आपल्याला खूप आनंद वाटला असंही तिने म्हटलं आहे.
मिया जिवंत आहे हे कळल्यानंतर लोकांनी तिला वेलकम केलं आहे. आम्ही तुला मिस केलं असंही एका फॅनने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका माणसाने लिहिलं आहे की मी तुला पाहून आनंदलो आहे. त्या फॅनने काही हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. काही लोक तिच्याशी संबंधित मीम्स शेअर करत आहेत.
आपल्या मीममध्ये तिने एक सिनेमामधला मीम शेअर केला आहे. 1975 ला मॉन्टि पैथॉन अँड द हॉली ग्रेल मूव्हीमधला हा सीन आहे. जो तिने मीम म्हणून शेअर केला आहे.
मिया खलिफा जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिची चर्चा झाली. फेसबुकवर मिया खलिफाचे 4.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 26.9 फॉलोअर्स आहेत. ट्विटरही तिचे भरपूर चाहते आहेत. तिच्या मृत्यूविषयी अफवा पसरण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अशा काही अफवा तिच्याबद्दल पसरल्या आहेत.
ADVERTISEMENT