विविध क्षेत्रात आपल्या कतृर्त्वाचा ठसा उमटवत लक्ष वेधून घेणाऱ्या बालकांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (वीरता श्रेणी), पुण्याची जुई केसकर (नव संशोधन श्रेणी), मुंबईतील जिया राय, नाशिकचा स्वयंम पाटील या चौघांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
शौर्य दाखवण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय शोधकार्य करणाऱ्या देशभरातील बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती सोमवारी (२४ जानेवारी) रोजी हा कार्यक्रम पार पडला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात बालकांना पुरस्कार देत पंतप्रधानांनी गौरव केला.
अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि शौर्य या सहा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार देण्यात आला. यावर्षी देशभरातील २९ मुलांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 15 मुले आणि 14 मुलींचा समावेश असून, महाराष्ट्रातील चौघांचा गौरव करण्यात आला.
जळगाव येथील शिवांगी काळे (शौर्य श्रेणी), पुण्याची जुई केसकर (नवसंशोधन श्रेणी), मुंबईतील जिया राय, नाशिकचा स्वयंम पाटील (क्रीडा श्रेणी) यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी प्रथमच विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्रं देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ
पंतप्रधान राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्या चिमुकल्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ थोपटली. प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव येथील शिवांगी काळे, पुण्याची जुई केसकर, मुंबईतील जिया राय, नाशिकचा स्वयंम पाटील यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केलं.
चिमुकल्या शिवांगीने वाचवले आईचे प्राण
जळगाव येथील शिवांगीला तिने दाखवलेल्या धाडसाबद्दल सन्मानित करण्यात आलं. शिवांगीने वयाच्या सहा वर्षाच्या शिवांगीने प्रसंगावधान राखत आपल्या आईचा जीव वाचवला होता. शिवांगीच्या आईला शॉक लागला होता. शिवांगीने धाडस दाखवत आईचे प्राण वाचवले.
पुण्याच्या जुईला तिने लावलेल्या शोधाबद्दल पुरस्कार देण्यात आला. जुईने पार्किसन आजार झालेल्या रुग्णांसाठी एक यंत्र तयार केलं आहे. तर स्वयंम पाटीलने क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. स्वयंमने १० वर्षाचा असताना ५ किमी, तर १३ वर्षांचा असताना १४ किमी पोहत जागतिक विक्रम केला आहे.
ADVERTISEMENT