Jayant Patil | Prateek Patil | NCP :
ADVERTISEMENT
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाली आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळात कोणाकोणाची वर्णी लावायची याचा निर्णय जयंत पाटील यांच्याच हातात होता. यातूनच प्रतिक पाटील यांनी आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत बिनविरोध बाजी मारली आहे. (Prateek Patil has been elected unopposed as the Director of Rajaram Bapu Patil Cooperative Sugar Factory)
कोण आहेत प्रतिक पाटील?
प्रतीक पाटील हे जयंत पाटील यांचे द्वितीय चिरंजीव आहेत. त्यांनी आपलं शिक्षण लंडनमधून पूर्ण केलं आहे. त्यांनी इंजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे. २०१४ पासूनच त्यांनी वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात लक्ष्य द्यायला सुरुवात केली आहे. आता कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
Pune : जगताप यांच्या बायकोला तिकीट, मग टिळकांच्या घराला भाजपनं का नाकारलं?
जयंत पाटील यांच्या पावलावर पाऊल :
प्रतिक पाटील यांनीही वडिलांप्रमाणे कारखान्याच्या राजकारणातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले. तिथून पुढे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी मोठी पद त्यांनी भूषविली. त्याच पावलावर पाऊल टाकत आता प्रतिक पाटील यांनीही कारखान्याच्या संचालकपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. ते यापूर्वीपासूनच मतदारसंघात काम करत असल्याने येणाऱ्या काळात विधानसभेलाही उभं राहणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Jayant Patil: “राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार”
शाही विवाहसोहळ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शन :
प्रतीक पाटील यांचा अलीकडेच शाही विवाह पार पडला. या विवाहाची राज्यभर चर्चा होती. दोन लाख लग्नपत्रिका, भला मोठा शामियाना, एकाच वेळी सुमारे पाच हजार लोकं जेवण करतील अशी व्यवस्था असा मोठा सोहळा पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केलं होतं. मुलाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असल्याचे बोलेलं गेलं होतं.
ADVERTISEMENT