Pune Crime : बाप तसा बेटा, कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई तक

• 02:19 PM • 23 Mar 2022

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. गजा मारणेचा मुलगा प्रथमेश मारणेविरुद्ध एका तरुणीने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ […]

Mumbaitak
follow google news

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. गजा मारणेचा मुलगा प्रथमेश मारणेविरुद्ध एका तरुणीने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. यावेळी आरोपीने तरुणीचे काही व्हिडीओही तयार केले.

पीडित तरुणीने व्हिडिओ डिलीट कर अशी विनंती अनेकवेळा करुनही प्रथमेशने तिचं म्हणणं ऐकलं नाही आणि तिला धमकी दिली.

यानंतर पीडित तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात प्रथमेश मारणेविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश मारणेने आपल्या आईसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पाचशे गाड्यांमधून मिरवणूक काढल्यामुळे गजा मारणे चर्चेत आला होता. त्यामुळे आता या प्रकरणात पुणे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp