IIM Nagpur New Campus : अत्याधुनिक सुविधा असलेलं नागपूरचं आयआयएम आतून कसं दिसतं?

मुंबई तक

• 09:25 AM • 08 May 2022

नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयआयएम व्यवस्थापन संस्थेच्या नवीन कॅम्पसचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. (IIM Nagpur new campus) आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तू नागपूर शहरात स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचा नवीन कॅम्पस लक्ष वेधून घेणारा आहे. २०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयआयएम नागपूरचा शहरातील शहरातील मिहान परिसरात तब्बल १३२ […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयआयएम व्यवस्थापन संस्थेच्या नवीन कॅम्पसचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. (IIM Nagpur new campus)

आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तू नागपूर शहरात स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचा नवीन कॅम्पस लक्ष वेधून घेणारा आहे.

२०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयआयएम नागपूरचा शहरातील शहरातील मिहान परिसरात तब्बल १३२ एकर जागेवर संस्थेचा कॅम्पस उभारण्यात आला आहे.

आयआयएम नागपूरचा कॅम्पस १३२ एकर परिसरावर पसरलेला असून, पहिल्या टप्प्यात ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील अशी रचना करण्यात आली आहे.

आयआयएम नागपूरच्या नव्या कॅम्पसमध्ये २० हाय-टेक क्लासरूम आणि २४ प्रशिक्षण आणि सेमिनार रूम्स आहेत.

शहराच्या अगदी शेजारी असलेल्या मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे.

सध्या ६६८ विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे.

१३२ एकराच्या या प्रकल्पामध्ये व्यवस्थापन आणि आस्थापनाचे महत्वाचे केंद्र उघडण्यात आले. यात ६६५ विद्यार्थी विविध शाखेमध्ये शिक्षण घेत आहे.

या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या प्रशिक्षणाची यंत्रसामुग्रीने ह्या वर्गखोलया सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार असून देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती या संस्थेला मिळत आहे.

४०० आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला आहे.

याठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत, त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले आहेत.

विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे.

समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण ७ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.

    follow whatsapp